scorecardresearch

SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉटसअ‍ॅप बँकिंग सुविधा कशी सुरू करायची जाणून घ्या

SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉटसअ‍ॅप बँकिंग सुविधा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How To Start SBI Whatsapp Banking: स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. आता खातेधारकांना थेट व्हॉटसअ‍ॅपवर बँक बॅलन्स तपासता येणार आहे. इतकेच नाही तर मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप अशा अनेक सुविधा व्हॉटसअ‍ॅपवर उपलब्ध होणार आहेत. एसबीआयकडुन कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत जाणून घ्या.

आणखी वाचा: SBI Recruitment 2023: एसबीआयमध्ये १४३८ पदांसाठी होणार भरती; पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

एसबीआयवर उपलब्ध व्हॉटसअ‍ॅप बँकिंग सुविधा

 • अकाउंट बॅलन्स
 • मिनी स्टेटमेंट
 • पेन्शन स्लिप सर्विस
 • कर्जाची माहिती
 • डिपॉजिट प्रोडक्टची माहिती
 • एनआरआय सर्व्हिस
 • इन्स्टा अकाउंट्स
 • हेल्पलाईन

आणखी वाचा: Zero Balance Account म्हणजे काय? ऑनलाईन सुरू करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

व्हॉटसअ‍ॅप बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

 • एसबीआय व्हॉटसअ‍ॅप बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी https://bank.sbi या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
 • तिथे देण्यात आलेला कोड मोबाईलद्वारे स्कॅन करा.
 • त्यानंतर +919022690226 या नंबरवर ‘Hii’ मेसेज पाठवण्यास सांगितले जाईल.
 • त्यानंतर ‘चॅट बोट’वर दिलेल्या सुचनांचे पालन करा.
 • जर रेजिस्ट्रेशन पुर्ण झाले, तर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणाऱ्या मोबाईलवर त्याचा मेसेज पाठवला जाईल.
 • अशाप्रकारे एसबीआय व्हॉटसअ‍ॅप बँकिंग सुविधा सुरू करता येईल.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या