आता ग्राहकांना डिझनी हॉटस्टार फ्रीमध्ये पाहता येणार आहे. चित्रपट, मालिकांचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेअल या दूरसंचार कंपन्या आपल्या काही प्लान्समध्ये फ्री कॉलिंग आणि डेटासह डिझनी आणि हॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री देत आहेत. या प्लान्सबद्दल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) रिलायन्स जिओ

जिओ युजर्सना दोन प्रिपेड प्लान उपलब्ध आहे. ४ हजार १९९ रुपयांचा प्लान आणि १ हजार ४९९ रुपयांचा प्लान. ४ हजार १९९ रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवस असून त्यामध्ये दिवसाला केवळ ३ जीबी डेटा वापरता येते. तर १ हजार ४९९ रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवस असून त्यामध्ये दिवसाला २ जीबी डेटा वापरता येते. या दोन्ही प्लान्समध्ये प्रिमियम डिझनी आणि हॉटस्टार सब्सक्रिप्शन एक वर्षांसाठी मिळत आहे.

(अनोखे स्टिकर्स पाठवून मित्रांना द्या दिवाळीच्या शुभेच्छा, व्हॉट्सअ‍ॅपवर असे करा डाऊनलोड)

२) भारती एअरटेल

१८१, ३९९ आणि ८३९ रुपयांच्या प्लान्समध्ये ३ महिन्यांकरिता डिझनी आणि हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळत आहे. तर ४९९, ५९९, २९९९ आणि ३३५९ रुपयांच्या प्लानमध्ये १ वर्षांचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे.

३) व्होडाफोन आयडिया

१५१ (३० दिवस), ३९९ (२८ दिवस), ४९९ आणि ६०१ (प्रत्येकी २८ दिवस), ९०१ (७० दिवस), १ हजार ६६ (८४ दिवस) आणि ३ हजार ९९ रुपये (३६५ दिवस), असे प्लान आहेत. यामधील १५१ आणि ३९९ रुपयांचे प्लान ३ महिन्यांकरिता मोफत ओटीटी सब्सक्रिप्शन देत आहेत. तर बाकी प्लान्स १ वर्षांकरिता मोफत ओटीटी सब्सक्रिप्शन देत आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get disney hotstar free subscription with this plans ssb