Desktop Computer In Just 399: सलिजन टेक्नॉलॉजीतर्फे, लहान मुलांसाठी अनुकूल असे क्लाउड आधारित संगणक ‘प्राहो’ विकसित करण्यात आले आहेत. अवघ्या ३९९ रुपयांच्या मासिक सदस्यत्व शुल्कासह वापरासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. मुंबईतील या स्टार्टअपने जगातील सर्वात कमी रक्कमेत ग्राहकांना कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. या कंपनीची बिझनेस मॉडेल पाहिल्यास आपल्याला कॉम्प्युटर वापरासाठी दरमहा केवळ ३९९ रुपये भरायचे आहेत. नोंदणीच्या वेळी आपल्याला केवळ ३६०० रुपये डिपॉझिट भरून ही सेवा सुरु करता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉम्प्युटरची गरज काय?

इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या बाबत सबस्क्रिप्शन मॉडेल अद्याप नवीन आहे. परवडणाऱ्या मोबाइल डेटा प्लॅनमुळे सध्या स्मार्टफोन हा कॉम्प्युटरला उत्तम पर्याय ठरत आहे मात्र अजूनही विशिष्ट कारणांसाठी कॉम्प्युटरची गरज पूर्णपणे संपलेली नाही. अनेकजण जे कॉम्प्युटर वापरत नाहीत किंवा खरेदी करत नाहीत त्यामागे त्यांच्या गरजेपेक्षा ‘किंमत’ हा अधिक महत्त्वाचा मुद्दा असतो. सर्वात बेसिक कॉम्प्युटर मॉडेलची रक्कमही २० हजारापासून सुरु होते अशावेळी हे नवीन मासिक सदस्यत्व ग्राहकांना कमी रक्कमेत अधिक लाभ मिळवून देणारे ठरू शकते.

केबलप्रमाणे कॉम्प्युटर..

सलिजन टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक नमन चक्रवर्ती, योशिता सेनगुप्ता आणि जॉबी जॉन यांच्या संकल्पनेतून कोविड १९ ची साथ बळावली असताना हा कॉम्प्युटर विशेषतः लहान मुलांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आला होता. सीओओ सेनगुप्ता प्राहोच्या सबस्क्रिप्शन-आधारित सेवांविषयी सांगताना म्हणतात की, “भारतीय अॅपसाठी पैसे देऊ इच्छित नाहीत पण ९०च्या दशकापासून केबल टीव्हीसाठी नंतर ओघाओघाने डिश टीव्हीसाठी पैसे देत आहेत. त्यामुळे सबस्क्रिप्शन मॉडेल जोपर्यंत सेवा किंवा उत्पादन पैशाच्या योग्येतचे मूल्य देईल तोपर्यंत यात तक्रारी येणार नाहीत”.

हे ही वाचा >> २०२२ मधील सर्वात खतरनाक पासवर्डची यादी जाहीर; तुमच्या कुठल्याच अकाउंटला चुकूनही वापरू नका

सेनगुप्ता यांच्या माहितीनुसार आतापर्यंत प्राहोच्या दोन आवृत्त्या तपासण्यात आल्या आहेत एका स्थानिक मशीनमध्ये कस्टम लिनक्स ओएसमार्फत इंटरनेटशिवाय काम करणे शक्य होत होते. मात्र विंडोज क्लाउड ओएसच्या बाबत अद्याप तपासणी सुरु आहे. क्लाउड-आधारित संगणक हे केवळ एका ओटीपीच्या माध्यमातून वापरले जाऊ शकतात मात्र त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते, भारतीय बाजारात क्लाउड ऐवजी सध्या लिनक्स ओएसला अधिक मागणी आहे कारण, या दोघांच्या किंमतीत मोठा फरक दिसून येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden chance computer desktop in only 3 monthly subscription mumbai startup launched amazing benefits svs