Latest Smartphones: लॉन्च होण्यापूर्वीच Google Pixel 8 Pro चा फर्स्ट लुक आला समोर; ६.७ इंचाचा डिस्प्लेसह…

गुगलच्या या नवीन स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये HDR टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

google pixel 8 first look before luanching
गुगल पिक्सल ८ प्रो- (image credit- social media)

google pixel सिरीजमधील नवीन स्मार्टफोनबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. १० मे रोजी Google चा सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात. या इव्हेंटमध्ये नवीन पिक्सल स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro स्मार्टफोन यामध्ये लॉन्च होऊ शकतात. मात्र लॉन्च होण्याआधीच सुमारे दोन महिने या गुगलच्या स्मार्टफोन्सचे फर्स्ट लुक समोर आला आहे.

Smartprix आणि tipster @Onleaks च्या एका विशेष रिपोर्टनुसार Google Pixel 8 Pro स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. लीक झालेल्या फोटोनुसार फोनमध्ये मागच्या फोनपेक्षा थोडे वेगळे डिझाईन दिले जाऊ शकते.oogle ने कॅमेरा मॉड्यूल देखील बदलले आहे. तिन्ही कॅमेरा लेन्स मागील पॅनलवरील एकाच ओव्हल भागात एकत्रित केल्या आहेत आणि फ्लॅशच्या खाली एक नवीन सेन्सर आहे.

हेही वाचा : VIDEO: Google च्या सर्वात मोठ्या इव्हेंटची तारीख जाहीर; लॉन्च होणार Android 14 आणि…

डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास Pixel 8 Pro या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. यामध्ये पंच-होलमध्ये सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन फ्लॅट पॅनलसह येतो. रिपोर्नुसार डिव्हाईसची जाडी १२ मिमी असू शकते. Pixel 8 या सिरीजमधील फोनमध्ये Google Tensor G3 चिपसेट असल्याची माहिती समोर आली आहे. याच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये HDR टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. तसेच फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

Google Pixel 8 बद्दल, Tipster Steve Hemmerstoffer ने दावा केला आहे की फोनमध्ये ५.८ इंचाचा डिस्प्ले असेल आणि तो एक कॉम्पॅक्ट डिव्हाईस असणार आहे. Pixel 7 प्रमाणेच Pixel 8 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 13:01 IST
Next Story
WhatsApp चे नवीन फिचर! आता फोटोवरील मजकूर क्षणात करता येणार कॉपी, कसं ते जाणून घ्या
Exit mobile version