कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात. याच Google चा यंदाचा वार्षिक इव्हेंट हा Google I/O मे २०२३ या महिन्यात होणार असून गुगलने याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

गुगलचा हा वार्षिक इव्हेंट Developer Conference हा कॅलिफोर्निया येथे आयोजित केला जातो. ‘I/O’ म्हणजे इनपुट/आउटपुट होय. या इव्हेंटची टॅगलाईन ही ‘Innovation in the Open’ अशी आहे. हा कार्यक्रम गुगल डेव्हलपर डे सारखाच आहे. Google I/O हा इव्हेंट पहिल्यांदा २००८ मध्ये आयोजित करण्यात आला होता. तेव्हपासून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. मात्र करोना महामारीच्या काळामध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला नव्हता. google या वर्षीच्या इव्हेंटमध्ये अनेक प्रॉडक्ट लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : आनंदाची बातमी! BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस, ‘या’ राज्यापासून होणार सुरुवात

कंपनीने Google I/O 2023 इव्हेंटचा पहिला टिझर म्हणून वेब पझलद्वारे कॉन्फरन्सची तारीख आणि स्थान जाहीर केले आहे. हे पझल सोडवले की लक्षात येते की, Google I/O 2023 इव्हेंट 10 मे रोजी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथील शोरलाइन अ‍ॅम्फीथिएटर येथे होणार आहे. यंदाच्या इव्हेंटमध्ये गुगल अनेक प्रॉडक्ट लॉन्च करू शकते अशी अपेक्षा आहे. इव्हेंटमध्ये Android 14 लॉन्च केले जाऊ शकते. Android 14 चे डेव्हलपर प्रिव्ह्यू Google ने आधीच रिलीझ केले आहे. तसेच इव्हेंटमध्ये Google नवीन फीचर्ससह Android वर येणारे डिझाइनमधील अपडेट लॉन्च करू शकते.

तसेच या इव्हेंटमध्ये Google Pixel 7a देखील लॉन्च केला जाऊ शकतो. या फोनबाबतची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. लीक्स लीक्सनुसार, Google Pixel 7a मध्ये ६.१ -इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. इव्हेंटमध्ये पिक्सेल फोल्ड देखील लॉन्च केला जाणायची शक्यता आहे.