Google will close this popular service | Loksatta

गुगल करणार ‘ही’ लोकप्रिय सेवा बंद ; जाणून घ्या कारण…

गुगलने आपली क्लाउड-बेस्ड गेमिंग सेवा जानेवारी २०२३ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगल करणार ‘ही’ लोकप्रिय सेवा बंद ; जाणून घ्या कारण…
Photo-indianexpress

गुगलने आपली क्लाउड-बेस्ड गेमिंग सेवा Stadia (gaming service Stadia) जानेवारी २०२३ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Stadia ही Google ची क्लाउड व्हिडीओ गेमिंग सेवा आहे जी तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. गुगलने आपल्या एका ब्लॉगमध्ये Stadia बंद झाल्याची माहिती दिली आहे.

Stadia बंद होण्याचे कारण

गुगलचे उपाध्यक्ष फिल हॅरिसन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, “वापरकर्त्यांना Stadia आमच्या अपेक्षेप्रमाणे आवडले नाही. यामुळे आम्ही आमची Stadia स्ट्रीमिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खरेदी केलेल्या हार्डवेअर आणि गेम सामग्रीची रक्कम परत करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पुढील वर्षी १८ जानेवारीपर्यंत वापरकर्त्यांना ही सेवा उपलब्ध असेल.

आणखी वाचा : आजपासून 5G सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांसह १३ शहरांत मिळणार 5G चं सुपरफास्ट नेटवर्क; पाहा यादी

Xbox ची मूळ कंपनी मायक्रोसॉफ्ट सध्या Stadia सारखी गेम पास सेवा देत आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना शेकडो गेम देखील मिळतात. मायक्रोसॉफ्टच्या गेम पासचे २५ दशलक्ष सदस्य आहेत, तर गुगलच्या स्टॅडियाचे एक दशलक्षपेक्षा कमी सदस्य आहेत. Stadia द्वारे, लोक कन्सोल सारख्या ईमेलवर गेम खेळू शकतात.

काही दिवसांपूर्वीच सॅमसंगच्या टीव्हीसोबत मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स गेम सपोर्ट मिळाला आहे. Amazon ने या वर्षाच्या सुरुवातीला लुना व्हिडीओ गेम नावाची स्ट्रीमिंग सेवा देखील सुरू केली, जी सध्या फक्त यूएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, जरी लवकरच ती इतर देशांमध्ये रिलीज करण्याची योजना आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!

संबंधित बातम्या

Reliance Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन! १४९ रुपयांपासून, २८ GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर
गौतम अदानींना मिळाला दूरसंचार परवाना; एडीएनएल लवकरच सुरू करणार दूरसंचार सेवा
काय आहे Netflix चे नवे प्रोफाइल ट्रान्सफर फीचर? कसे वापरायचे जाणून घ्या
Sim Card Rule: आता ‘या’ कागदपत्रांवर घेता येणार नाही सिमकार्ड; सरकार आणणार नवीन नियम; जाणून घ्या काय आहे कारण…
OnePlus: जबरदस्त बॅटरीसह एक मस्त मिड-रेंज 5G स्मार्टफोन लाँच करणार; लाँचपूर्वीच स्मार्टफोनचे तगडे फीचर्स लीक!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार