Google will close this popular service | Loksatta

गुगल करणार ‘ही’ लोकप्रिय सेवा बंद ; जाणून घ्या कारण…

गुगलने आपली क्लाउड-बेस्ड गेमिंग सेवा जानेवारी २०२३ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगल करणार ‘ही’ लोकप्रिय सेवा बंद ; जाणून घ्या कारण…
Photo-indianexpress

गुगलने आपली क्लाउड-बेस्ड गेमिंग सेवा Stadia (gaming service Stadia) जानेवारी २०२३ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Stadia ही Google ची क्लाउड व्हिडीओ गेमिंग सेवा आहे जी तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. गुगलने आपल्या एका ब्लॉगमध्ये Stadia बंद झाल्याची माहिती दिली आहे.

Stadia बंद होण्याचे कारण

गुगलचे उपाध्यक्ष फिल हॅरिसन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, “वापरकर्त्यांना Stadia आमच्या अपेक्षेप्रमाणे आवडले नाही. यामुळे आम्ही आमची Stadia स्ट्रीमिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खरेदी केलेल्या हार्डवेअर आणि गेम सामग्रीची रक्कम परत करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पुढील वर्षी १८ जानेवारीपर्यंत वापरकर्त्यांना ही सेवा उपलब्ध असेल.

आणखी वाचा : आजपासून 5G सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांसह १३ शहरांत मिळणार 5G चं सुपरफास्ट नेटवर्क; पाहा यादी

Xbox ची मूळ कंपनी मायक्रोसॉफ्ट सध्या Stadia सारखी गेम पास सेवा देत आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना शेकडो गेम देखील मिळतात. मायक्रोसॉफ्टच्या गेम पासचे २५ दशलक्ष सदस्य आहेत, तर गुगलच्या स्टॅडियाचे एक दशलक्षपेक्षा कमी सदस्य आहेत. Stadia द्वारे, लोक कन्सोल सारख्या ईमेलवर गेम खेळू शकतात.

काही दिवसांपूर्वीच सॅमसंगच्या टीव्हीसोबत मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स गेम सपोर्ट मिळाला आहे. Amazon ने या वर्षाच्या सुरुवातीला लुना व्हिडीओ गेम नावाची स्ट्रीमिंग सेवा देखील सुरू केली, जी सध्या फक्त यूएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, जरी लवकरच ती इतर देशांमध्ये रिलीज करण्याची योजना आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!

संबंधित बातम्या

‘PTRON’ने सादर केला जबरदस्त नेकबँड, सिंगल चार्जवर ६० तासांच्या बॅटरी लाइफचा दावा, किंमत केवळ..
YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा
आता मास्क लावला असेल तरी आयफोन होईल अनलॉक, अ‍ॅपलने आणलं नवं फिचर
कुठूनही कुठेही… देशाच्या कानाकोपऱ्यातून मागवता येणार हवे ते खाद्यपदार्थ; जाणून घ्या Zomato च्या नव्या सेवेबद्दल
FIFA World Cup 2022: Vodafone Ideaने लाँच केले चार जबरदस्त प्लॅन; कॉल-डेटा-SMS सह मिळणार ‘हे’ फायदे

व्हिडिओ

ताज्या बातम्या
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुण्यातील मनसेने कर्नाटकच्या गाड्यांना फासले काळे; जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून नोंदविला निषेध
“हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…
‘फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवी नगरपालिका’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
“कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्र…”, सीमावादावरून सुषमा अंधारे आक्रमक, भाजपावर गंभीर आरोप