टेक्नॉलॉजीचा योग्य वापर पाल्याकडून व्हावा त्याचबरोबर अतिवापर सुद्धा होऊ नये, यासाठी अनेक पालक आग्रही असतात. यासाठीच गुगलने पुन्हा एकदा त्यांचे ‘फॅमिली लिंक’ अ‍ॅप नवीन फिचर्ससह सादर केले आहे. मुलांनी टेक्नॉलॉजीचा वापर करताना यावर नियंत्रण सुद्धा ठेवता येईल, असे गुगलने सांगितले आहे. गुगलने ने ‘फॅमिली लिंक’ पहिल्यांदा २०१७ मध्ये सादर केली होते. गुगलच्या या अ‍ॅपमुळे पालकांना मुलांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅपमध्ये तीन नवीन वैशिष्ट्ये

या फॅमिली लिंकच्या नव्या आवृत्तीमध्ये हायलाइट, कंट्रोल आणि लोकेशन हे तीन नवीव वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. नवीन अ‍ॅपमध्ये सूचनांसाठी मध्यवर्ती हबदेखील आहे. याशिवाय या अॅपच्या मदतीने पालक त्यांच्या मुलांचे फोन किंवा टॅब्लेट लॉक करू शकतात. तसेच अ‍ॅप वापरण्यासाठी वेळदेखील निश्चित करू शकतात.

आणखी वाचा : दिवाळीत ‘ओटीटी’ झाली स्वस्त, आता मनोरंजन करा मस्त! ५९ रूपयांमध्ये मिळवा २५ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन!

फॅमिली लिंकच्या नव्या अपडेटमध्ये सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकेशन टॅब आहे. यामुळे पालकांच्या फॅमिली लिंक अ‍ॅपमध्ये मुलांच्या फोनचे लाईव्ह लोकेशन बॅटरी लेव्हलसह दाखवले जाणार आहे. याशिवाय मुले शाळेमधून बाहेर पडताच पालकांना गुगल मॅपद्वारे त्याचा अलर्ट मिळणार आहे. तसेच मुलांच्या फोनवर येणाऱ्या सर्व सूचनांची माहिती पालकांना या अ‍ॅपमध्येच मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Googles family link app for parents pdb