Book LPG cylinder through WhatsApp: एलपीजी सिलेंडर बुक करणे फार कटकटीचे समजले जाते. ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी गॅस कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता. ग्राहकांच्या सोयीसाठी या कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणे शक्य झाले आहे. गॅस कंपनी, एजन्सी किंवा वितरकांना अधिकृत क्रमांकावर फोन करुन सिलेंडरसाठी विचारपूस करता येते. बहुतांश लोक फोन करुन गॅस बुक करत असतात. काहीजण वेबसाइटवर जाऊन तेथून सिलेंडर ऑर्डर करतात. तर काहींना प्रत्यक्ष एजन्सीमध्ये जाऊन सिलेंडर बुक करायची सवय असते. या पद्धतींमुळे लोकांचा बराचसा वेळ आणि काही वेळेस पैसे देखील खर्च होत असतात. याउलट व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पर्यायाचा अवलंब केल्याने हे महत्त्वपूर्ण काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Indaneचा गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स :

ग्राहक 7718955555 या नव्या क्रमांकावर फोन करुन इंण्डेनचा एलपीजी गॅस सिलेंडर बुक करु शकतात.
या व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देखील गॅस बुकींगची प्रक्रिया पूर्ण करता येते.
यासाठी 7588888824 या क्रमांकावर REFILL असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करावा लागेल.
गॅस कंपनीमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या फोन नंबरने गॅस बुक करता येतो. नोंद नसलेल्या नंबरवरुन मेसेज केल्यास सुविधा पुरवण्यात येणार नाही.

आणखी वाचा – व्हॉट्सअ‍ॅपने सुरु केले ‘Stay Safe with WhatsApp’ अभियान; वापरकर्त्यांना ‘हे’ धोके टाळता येणार

HPचा गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स :

ग्राहक 9222201122 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करुन एचपीचा गॅस सिलेंडर बुक करु शकतात.
या नंबरवर BOOK असा मेसेज केल्यावर गॅस सिलेंडर बुकींगची प्रक्रिया पूर्ण होईल.
दरम्यान गॅस बुक करतानाही काही प्रश्न विचारुन माहिती घेण्यात येईल.
एलपीजी कोटा, एलपीजी आयडी, एलपीजी सबसिडी यासारख्या सेवांबाबतची माहिती मिळवण्यासाठीही वरील फोन नंबरची मदत होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to book lpg gas cylinder through whatsapp follow these steps yps