How to check EPF Balance : ईपीएफ (EPF) म्हणजेच एम्प्लॉइज प्रॉव्हिडेंट फंड. ही केंद्र सरकारची योजना असून त्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुद्धा म्हणतात. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जशी प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधी) असते तसेच खाजगी किंवा इतर संस्था व कंपनी यांच्या कर्मचाऱ्यांसाठी इपीएफ ही योजना असते. या योजनेचा मूळ उद्देश कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला एकरकमी मोठी रक्कम किंवा आर्थिक लाभ मिळावा. ईपीएफसाठी पैसा हा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केला जातो. एक ठराविक रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात होते आणि तितकीच रक्कम कंपनी स्वत: टाकते. जेव्हा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला व्याजासहित ही रक्कम व केंद्राचा निधी अशी एकत्रित मोठी रक्कम मिळते. निवृत्तीनंतर पैशांची योग्य बचत व्हावी, यासाठी इपीएफमध्ये किती रक्कम आहे, याचा सतत मागोवा ठेवणे गरजेचे आहे. ऑफलाइन एसएमएस सेवांसह विविध पद्धतीने तुम्ही ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम सहज तपासू शकता. हे तपासण्यासाठी उमंग ॲप हे एक सोयीस्कर ऑनलाइन पर्याय आहे. जाणून घेऊ या, उमंग (UMANG) ॲपवरून पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम कशी तपासावी. हेही वाचा : NOTA म्हणजे काय? NOTA ला सर्वाधिक मते मिळाल्यावर काय होते? पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम ऑनलाइन तपासण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहे. १. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) २. EPFO कडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक उमंग ॲप वापरून तुमची ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी खालील गोष्टी फॉलो करा. १. Google Play Store किंवा Apple App Store वर उमंग ॲप (UMANG) डाउनलोड करा२. तुमचा मोबाईल नंबर वापरून उमंग ॲपवर नोंदणी करा.३. नोंदणी केल्यानंतर EPFO सेवा शोधा.४. EPFO पर्यायावर क्लिक करा.५. पासबूक पाहा (View Passbook) वर क्लिक करा.६. त्यानंतर तीन पर्याय दिसतील. त्यातील कर्मचारी-केंद्रित सेवा (Employee-Centric Service) वर क्लिक करा.७. तुमचा युएन नंबर टाका आणि लॉग इन करा.८. ज्या मोबाइलनंबरवर तुमचे पीएफ अकाउंट लिंक आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल.९. ओटीपी टाका आणि ओकेवर क्लिक करा.१०. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम दिसेल. हेही वाचा : NVSP पोर्टलवर मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी कशी करावी, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर लक्षात घ्या, तुमचा मोबाईल नंबर UAN नंबरशी लिंक आहे का, याची खत्री करा.मोबाईल नंबर UAN नंबरशी लिंक नसल्यास, तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहता येणार नाही.