Premium

आयफोनवर ios 17 आणि ipados 17 बीटा अपडेट कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

Apple WWDC event 2023: काल रात्री Apple चा इव्हेंट पार पडला. त्यामध्ये सीईओ टीम कूक यांनी अनेक प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे.

how to download ios 17 and ipdad 17 update
ios 17 आणि iPadOS 17 बीटा कसे डाउनलोड करायचे ? (Image Credit- Apple)

काल रात्री Apple चा WWDC इव्हेंट पार पडला. सीईओ टीम कूक यांनी अनेक प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे. नवीन iOS सॉफ्टवेअरपासून ते कंपनीने आपला पहिला रिऍलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. आता iOS 17 सह, Apple ने खूप नवीन फीचर्स सादर केलेली नाहीत. मात्र iOS १६ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनीने iOS 17अपडेट मिळू शकते अशा आयफोन्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये तीन लोकप्रिय आयफोनच्या समावेश नाही आहे. iPadOS 17 beta आणि iOS 17 हे कसे डाउनलोड करायचे ते पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक बीटा रिलीज शिवाय Apple चे डेव्हलपर बीटा रिलीज जर का तुम्ही त्या डेव्हलपर प्रोग्रॅमचा भाग असाल तरच उपलब्ध आहेत. ज्याची किंमत प्रति वर्ष $९९ (सुमारे ८,२०० रुपये ) आहे. जुलैमध्ये येणाऱ्या OS 17 आणि iPadOS 17 पब्लिक बीटाची वाट पाहायची नसल्यास तुम्ही बीटा रिलीज वापरून पाहण्यासाठी साइन आप करू शकता. तुम्ही आधीपासूनच बीटा डेव्हलपरचा भाग असल्यास ते कसे डाउनलोड करायचे त्याच्या स्टेप्स जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : WWDC 2023: iOS 17 बीटा रिलीज झालं, पण ‘या’ आयफोन्सला मिळणार नाही अपडेट, वाचा यादी

iOS 17 बीटा आणि iPadOS 17 बीटा कसे डाउनलोड करायचे ?

१. सर्वात प्रथम वापरकर्त्यांनी iPhone किंवा iPad वर डेटा बॅकअप घेणे आवश्यक आहे.

२. Apple डेव्हलपर App अ‍ॅप स्टोअरवरून इन्स्टॉल करावे आणि त्यानंतर ते ओपन करावे.

३. आता अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे युजरनेम आणि पासवर्डसह साइन इन करा. हे झाले की तुमची माहिती सबमिट करा.

४. वरील सर्व क्रिया झाली की वापरकर्त्यांची वैयक्तिक पर्याय निवडावा. परवानगीसाठी सर्व अटी स्विकाराव्यात. तसेच वर्षाची फी भरावी.

५. तुम्ही Apple डेव्हलपर प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन केले आहे की नाही हे व्हेरिफाय करावे.

६. आता सेटिंग्ज App उघडावे आणि General > Software Update > Beta Updates > iOS 17 Developer बीटा / iPadOS 17 Developer बीटा वर क्लिक करावे.

७. मागील स्क्रीनवर डाउनलोड, इन्स्टॉल क्लिक करण्यासाठी डेव्हलपर बीटाची प्रतीक्षा करावी.

८. अपडेट प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमचा डिव्हाईस पासकोड किंवा पासवर्ड एंटर करावा. आणि नंतर अटी व शर्ती मंजूर कराव्यात.

हेही वाचा : Apple WWDC 2023 : अ‍ॅपलने Mixed Reality हेडसेट, iOS 17 सह लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट्स, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

iOS 17 अपडेट मिळणाऱ्या आयफोन्सची यादी

iPhone 14

iPhone 14 Plus

iPhone 14 Pro

iPhone 14 Pro Max

iPhone 13

iPhone 13 mini

iPhone 13 Pro

iPhone 13 Pro Max

iPhone 12

iPhone 12 mini

iPhone 12 Pro

iPhone 12 Pro Max

iPhone 11

iPhone 11 Pro

iPhone 11 Pro Max

iPhone XS

iPhone XS Max

iPhone XR

iPhone SE (2nd generation or later)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 15:10 IST
Next Story
WWDC 2023: iOS 17 बीटा रिलीज झालं, पण ‘या’ आयफोन्सला मिळणार नाही अपडेट, वाचा यादी