काल रात्री Apple चा WWDC इव्हेंट पार पडला. सीईओ टीम कूक यांनी या अनेक प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे. नवीन iOS सॉफ्टवेअरपासून ते कंपनीने आपला पहिला रिऍलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. आता iOS 17 सह, Apple ने खूप नवीन फीचर्स सादर केलेली नाहीत. मात्र iOS १६ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनीने iOS 17अपडेट मिळू शकते अशा आयफोन्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये तीन लोकप्रिय आयफोनच्या समावेश नाही आहे. Apple कंपनीने जाहीर केलेल्या अधिकृत यादीनुसार, iPhone Xs आणि नंतरच्या मॉडेल्सना कंपनी iOS 17 अपडेट देणार आहे. मात्र तीन असे आयफोन आहेत ज्यांना हे अपडेट मिळणार नाही आहे. iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 Plus या तीन फोनचा अपडेट न मिळणाऱ्या यादीमध्ये समावेश आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे. हेही वाचा : भारतात अॅपल स्टोअर्सची मोठी कमाई: ४० लाख रुपये भाडे देऊन कंपनीने कमावले तब्बल ‘इतके’ कोटी प्रत्येक वर्षी हे असेच घडत असते. Apple ने नवीन अपडेटमधून काही फोन वगळले. Apple कंपनी डिव्हाईस रिलीज झाल्यानंतर ५ वर्षांपर्यंत नवीन iOS अपडेटचा सपोर्ट देते. iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 Plus हे फोन २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. सध्या, Apple ने iOS 17 बीटा अपडेट रिलीज केले आहे. तर स्टेबल अपडेट या वर्षाच्या शेवटीआणले जाणार आहे. आता जे या अपडेटसाठी पात्र असलेले जे फोन आहे त्याबद्दल जाऊन घेऊयात.कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, Phone Xs नंतरच्या सर्व मॉडेल्सना iOS 17 अपडेट मिळणार आहे. असे म्हटले जात आहे, आयफोन १५ ही सिरीज iOS 17 स्टेबल अपडेट मिळवणारी पहिली सिरीज असेल. iOS 17 अपडेट मिळणाऱ्या आयफोन्सची यादी iPhone 14 iPhone 14 Plus iPhone 14 Pro iPhone 14 Pro Max iPhone 13 iPhone 13 mini iPhone 13 Pro iPhone 13 Pro Max iPhone 12 iPhone 12 mini iPhone 12 Pro iPhone 12 Pro Max iPhone 11 iPhone 11 Pro iPhone 11 Pro Max iPhone XS iPhone XS Max iPhone XR iPhone SE (2nd generation or later)