लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेत बरीच प्रगती झाली होती. वर्क फ्रॉम होम असो वा लेक्चर्स सर्व काही इंटरनेटच्या बळावर शक्य झाले होते. पण अलीकडे भारतात 5G च्या आगमनानंतर इंटरनेटचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशामध्ये गावखेड्यात किंवा शहरांमध्येही इंटरनेटचा वापर मनोरंजन किंवा ऑनलाईन शॉपिंगसाठी करणे खर्चिक बाब ठरू शकते. मात्र याच समस्येवर भारत सरकारने शुगरबॉक्स नेटवर्कसोबत पार्टनरशिप करून उपाय शोधला आहे. प्राप्त माहितीनुसार गावोगावी एंटरटेनमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगचा मोफत प्लॅटफॉर्म तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला ठाऊक असेल की, डिजिटल इंडिया अंतर्गत भारत सरकारने प्रत्येक गावात कॉमन सर्विस सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून शुगरबॉक्स नेटवर्क हाइपरलोकल क्लाउड एज टेक्नोलॉजीच्या अंतर्गत मनोरंजन, शॉपिंग व शिक्षणाचा एक विना इंटरनेट चालणारा प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. सध्या उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि उत्तराखंड मधील गावात हे काम सुरु आहे.

शुगरबॉक्स व CSC चा प्लॅन कसा करणार काम?

शुगरबॉक्सचे सीईओ रोहित परांजपे यांच्या माहितीनुसार देशातील ७० कोटी लोकसंख्या इंटरनेटने जोडलेली असली तरी उत्तम स्पीडचे नेटवर्क केवळ २५-३० कोटी लोकांकडेच उपलब्ध आहे. महाग डेटा प्लॅनमुळे हे प्रमाण आणखी कमी होऊ शकते. अशावेळी संपूर्ण भारतभर नेट उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. या नव्या प्रणालीसह केवळ सिमकार्ड रेंज मध्ये असणे आवश्यक आहे. आपण विना इंटरनेट सुद्धा मूव्ही, वेबसिरीज डाउनलोड करू शकणार आहेत. केवळ मनोरंजनच नाही तर ऑनलाईन आरोग्य सेवांचा व शिक्षणाचा लाभ सुद्धा या माध्यमातून गावोगावी पोहचवण्याचे काम केले जाईल. तूर्तास शुगरबॉक्स व सीएससी अंतर्गत Zee5 चा कॉन्टेन्ट उपलब्ध आहे. या सिस्टीम मध्ये अन्य प्लॅटफॉर्मवरील शो व चित्रपट उपलब्ध करून देण्याचे काम सुद्धा सुरु आहे.

Crush असो किंवा EX, कोणाचंही व्हॉट्सऍप स्टेट्स गुपचूप पाहता येणार; सेटिंगमध्ये फक्त ‘हे’ बदला

शुगरबॉक्स च्या सेवांचा लाभ कसा घ्याल?

  • शुगरबॉक्स ऍप वापरण्यासाठी मोबाईल युजरला सीएससी सेंटर मध्ये जायचे आहे
  • इथे आपल्याला शुगरबॉक्स डिव्हाईस इन्स्टॉल केलेला आहे का आहे तपासून घ्या
  • या डिव्हाईसची रेंज १०० मीटर आहे, तुम्हाला काही डाउनलोड करायचे असल्यास तुम्हाला या रेंज मध्ये यावे लागेल.
  • आपल्याला फोनचे वाय फाय पर्याय निवडून SugarBox Network शी कनेक्ट करायचे आहे .

शुगरबॉक्स हा एक कमी एमबीचा ऍप आहे त्यामुळे तो डाउनलोड करण्यासाठी सुद्धा आपल्याला कमी इंटरनेट खर्ची घालावे लागेल. आपलायला अँड्रॉइड व ios वर प्ले स्टोअर व ऍप स्टोअर वरून डाउनलोड करता येईल. या ऍप अंतर्गत वापरकर्त्यांचा डेटा अत्यंत सुरक्षित राहील असे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to download movies for free govt brings sugarbox platform along with csc know details svs
First published on: 17-08-2022 at 12:40 IST