Har Ghar Tiranga: ७५वा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात तल्लीन झालेला दिसतो आहे. भारत सरकारकडून देखीक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला जात असून त्यासोबत हर घर तिरंगा मोहीमही जोमात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन प्रत्येक नागरिकाला केले आहे. त्याच वेळी, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय नागरिक त्यांच्या डीपीवर म्हणजेच व्हॉट्सऍप प्रोफाइलवर तिरंग्याचा फोटो लावत आहेत. तुम्हालाही तिरंगा डीपी व्हॉट्सअॅप किंवा इंस्टाग्रामवर टाकायचा असेल तर आम्ही खूप सोपे मार्ग दिले आहेत. ज्याने तुम्ही इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सऍपवर डीपी सहजपणे अपलोड करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर प्रोफाईल पिक्चर कसा बदलावा

  • Instagram वर, तळाशी उजवीकडे प्रोफाइल चिन्हावर क्लिक करा.
  • प्रोफाईल उघडल्यानंतर, प्रोफाइल संपादित करा असे चिन्ह दिसेल, त्यावर टॅप करा.
  • येथे Change Profile Photo चा पर्याय येईल, त्याला टॅप करा.
  • नवीन प्रोफाइल फोन पर्याय निवडा आणि गॅलरीत तिरंगा फोटो जतन करा निवडा
  • फोटोचा आकार समायोजित करा आणि ओके बटण दाबा. तिरंगा इन्स्टाग्राम डीपीवर सेट केला जाईल.

( हे ही वाचा: 4G सिमवर 5G सेवा उपलब्ध असेल का? की नवीन सिमची आवश्यकता असेल? जाणून घ्या सविस्तर)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to put tricolor profile picture on instagram and whatsapp gps
First published on: 13-08-2022 at 12:13 IST