How to restrict WhatsApp media downloads : दररोज सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सॲपवरून आपल्याला अनेक ग्रुप्सवरून सुप्रभात, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ अशा शुभेच्छांचे मेसेज येत असतात. त्यामध्ये कधी चहाच्या कपचे, फुलांचे किंवा प्राण्यांचे सुंदर फोटो पाठविले जातात. तर कधी अगदी दोन ते तीन सेकंदांचे व्हिडीओ किंवा जिफ [GIF] पाठवले जातात. कालांतराने हेच डाउनलोड झालेले फोटो आणि व्हिडीओ आपल्या फोनमधील गॅलरी व स्टोरेजचा ताबा मिळवतात. परिणामी आपला फोन विनाकारण भरला जाऊन, संथ गतीने काम करतो.

तुमचे स्टोरेज अशा अनावश्यक व्हॉट्सॲप मीडियाने भरून जाऊ नये यासाठी ॲपमध्ये काही बदल केल्याने तुमच्या स्टोरेज समस्येचे निराकरण होऊ शकते. त्यासाठी नेमके काय करावे ते पाहा.

हेही वाचा : Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क

व्हॉट्सॲपवरील मीडियाला डाऊनलोड होण्यापासून कसे थांबवावे?

  • प्रथम व्हॉट्सॲप सुरू करून, उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
  • सेटिंग्समध्ये जाऊन ‘स्टोरेज अॅण्ड डेटा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर आलेल्या सर्व पर्यायांच्या ‘मीडिया ऑटो डाऊनलोड’ पर्यायावर क्लिक करा.
  • शेवटी सर्व बॉक्स अनचेक करून ओके हा पर्याय निवडा.

मात्र, तुम्हाला गॅलरीचे स्टोरेज फुल होऊ न देता व्हॉट्सॲपवरील मीडिया ऑटो डाउनलोड करायचा असल्यास काय करावे ते पाहा.

  • प्रथम व्हॉट्सॲप सुरू करून उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
  • आता सेटिंग्समध्ये जाऊन ‘चॅट’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • शेवटी स्क्रीनवर दिसणारा मीडिया व्हिजिबिलिटी हा पर्याय बंद करा

अथवा

एखाद्या ठरावीक व्यक्तीसाठी ही सेटिंग वापरायची असल्यास,

  • प्रथम व्हॉट्सॲप सुरू करा.
  • तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी हे सेटिंग वापरायचे असेल, त्याचे चॅट उघडा.
  • आता त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘मीडिया व्हिजिबिलिटी’ या पर्यायावर क्लिक करा.
  • शेवटी ‘नो’ आणि ‘ओके’ हे पर्याय निवडा.