How to use Meta AI in Whatsapp Instagram : मेटाने अखेरीस आपले AI चॅटबॉट, मेटा AI असिस्टंट भारतामध्ये लाँच केले आहे. या इंटेलिजन्स असिस्टंटचा वापर वापरकर्ते आता व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि meta.ai मध्ये करू शकतात. मेटा AI चे साधारण दोन महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आले होते. तेव्हा हे तंत्रज्ञान केवळ न्यूझीलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये उपलब्ध होते. मेटा Llama ३ वर आधारित असणारे हे तंत्रज्ञान आजपर्यंतचे सर्वात प्रगत मॉडेल आहे. मेटा AI हे एक इंटेलिजंट असिस्टंट असून ते कॉम्प्लेक्स रिझनिंग [complex reasoning], सूचनांचे पालन करणे, कल्पना करणे [visualizing ideas] आणि लहानातल्या लहान समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम आहे. अशी माहिती ai.meta.com वरून मिळाली असल्याचे 'द क्विन्ट'च्या एका लेखावरून समजते. वापरकर्ते त्यांचे वापरत असलेले ॲप न सोडता, मेटा AI चा वापर फीडसाठी, चॅट्ससाठी करू शकतात. तसेच या AI चा वापर टास्क पूर्ण करण्यासाठी, कंटेन्ट तयार करण्यासाठी आणि सखोल विषयांचा अभ्यास करण्यासाठीदेखील करू शकतात. ज्या वापरकर्त्यांना कॉम्प्युटरवरून मेटा AI च्या मदतीने काही काम पूर्ण करायचे असेल त्यांनी meta.ai ला भेट द्यावी. मेटा AI विविध प्रकारे वापरकर्त्यांची मदत करू शकते. जसे की ई-मेल लिहून देणे, गणितं सोडवणे, चित्र [इमेज] तयार करणे, पाककृती शोधणे यांसारख्या कितीतरी गोष्टी हे तंत्रज्ञान सहजपणे करू शकते. आता मेटा AI व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर अशा विविध माध्यमांसाठी कसे वापरता येऊ शकते हे पाहू. हेही वाचा : OpenAI च्या सीईओने केले, ‘पुण्याच्या’ प्रफुल्ल धारिवालचे कौतुक! म्हणाले, “GPT-4o हे त्याचे कौशल्य…” व्हॉट्सॲपवर मेटा AI कसे वापरावे? [How to Use Meta AI in WhatsApp?] व्हॉट्सॲपमधील कोणतेही चॅट उघडा. आता, चॅट्स टॅबवरील 'मेटा AI' आयकॉनवर क्लिक करा. स्क्रीनवर येणाऱ्या अटी वाचा आणि मान्य करा. त्यानंतर एखादा प्रॉम्प्ट निवडा किंवा तुमचा स्वतःचा मजकूर टाइप करा. शेवटी प्रॉम्प्ट केलेला मजकूर पाठवा. इन्स्टाग्राममध्ये मेटा AI कसे वापरावे? [How to Use Meta AI in Instagram?] जर मेटा AI तुमच्या इन्स्टाग्राममध्ये सुरू झाले असेल तर ते कसे वापरावे पाहा. इन्स्टाग्राममधील कोणतेही संभाषण उघडा. आता स्क्रीनच्या तळाशी असणाऱ्या मेसेज बॉक्सवर क्लिक करा. त्यात “@” एंटर करा आणि नंतर मेटा AI वर क्लिक करा. आता तुमचा प्रश्न किंवा मेटा AI साठी रिक्वेस्ट करा. त्यानंतर तुमच्या मेसेजच्या पुढे क्लिक करा. तुमचा प्रश्न आणि Meta AI चा प्रतिसाद चॅटमध्ये मेसेज म्हणून पाठवला जाईल. हेही वाचा : Googleच्या जेमिनी-AI सह करता येईल ‘जेवणाचे प्लॅनिंग, व्हिडीओवरून शोध’! काय आहेत भन्नाट फीचर्स, पाहा फेसबुक मेसेंजरसाठी मेटा AI कसे वापरावे? [How to Use Meta AI in Facebook Messenger?] कोणतेही चॅट उघडा. टेक्स्ट बारमध्ये @ टाईप करून, नंतर मेटा AI वर क्लिक करा. मेटा AI मध्ये तुमचा मेसेज लिहा. मेटा AI तुमच्या प्रश्नाला प्रतिसाद देईल आणि तो चॅटमध्ये संदेश म्हणून पाठवला जाईल. अशा प्रकारे मेटा AI चा वापर, वापरकर्ते करू शकणार असल्याचे द क्विन्टच्या एका लेखावरून समजते.