If you are going to make EWS certificate know this important thing | Loksatta

EWS Certificate: ईडब्लूएस प्रमाणपत्र बनवणार आहात तर जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, अन्यथा…

ईडब्लूएस प्रमाणपत्राला मराठी मध्ये आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणतात, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बनविलेले प्रमाणपत्र आहे.

EWS Certificate: ईडब्लूएस प्रमाणपत्र बनवणार आहात तर जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, अन्यथा…
Photo-indianexpress

समाजातील गरिब आणि दारिद्रय रेषेखालील वर्गासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने त्यांच्या विकासासंदर्भात प्रयत्न केले जातात. आजही देशातील करोडो लोक आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने या लोकांना शिक्षण, आरोग्य आणि विविध क्षेत्रात संधी शोधण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना त्यांचा ईडब्लूएस प्रमाणपत्र बनवून विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी याचा लाभ घेता येईल.

ईडब्लूएस प्रमाणपत्र म्हणजे काय?

ईडब्लूएस प्रमाणपत्राला मराठी मध्ये आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणतात, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बनविलेले प्रमाणपत्र आहे. भारत सरकारने नुकतीच सुरू केलेली ही एक नवीन योजना आहे. ज्यामध्ये या योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल सामान्य वर्गाला केंद्राला नोकर्‍या व सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण दिले जाते.

शासकीय नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्यांचे उत्पन्न कमी आहे. अशा लोकांकडे ईडब्लूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बहुतांश लोकांना याचा लाभ सुद्धा घ्यायचा असतो पण ते कसे तयार केले जाते आणि त्याचे काय फायदे होतात ते नीट माहिती नसते. अशातच त्यांना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, हेही माहित नसते. हे जाणून घ्या.

आणखी वाचा : सावधान! सिमकार्ड घेताना ‘ही’ चूक टाळा; अन्यथा होईल कारावास

तुम्ही तुमच्या जवळच्या तहसीलदाराकडे जाऊन ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळवू शकता. ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे ते लोक ईडब्लूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. त्याच वेळी, अनुसूचित जाती/जमाती आणि ओबीसी भागातून येणारे वर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

हे विशेषत: सर्वसाधारण वर्गातील लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्याच वेळी, शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे २०० चौरस किंवा त्यापेक्षा कमी निवासी जमीन असणे आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती गावात राहते. अशा परिस्थितीत त्याच्याकडे पाच एकरपेक्षा कमी निवासी जमीन असावी.

तुम्ही ईडब्लूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला ओळखपत्र, शिधापत्रिका, स्वयंघोषित प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांची आवश्यकता असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : मोबाईलच्या IMEI क्रमांकाची सरकारकडे नोंदणी करणे का आहे आवश्यक? जाणून घ्या सविस्तर माहिती

संबंधित बातम्या

आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी: ‘या’ माॅडेलवर मिळतोय २१,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; सोबत आणखी बरंच काही, पाहा ऑफर
Redmi 10: ११ हजार रुपयांच्या मोबाईलचा पहिला सेल, जाणून घ्या डिस्काउंट ऑफर
Samsung चा बजेट फ्री स्मार्टफोन बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्सबद्दल
स्मार्टफोनमधील OS अपडेटमुळे होतात हे पाच मोठे फायदे; जाणून घ्या
5G सिम कसे असेल आणि तुमचा मोबाईल नंबर 5G मध्ये कसा बदलला जाईल? संपूर्ण माहिती जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी
‘ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये’; राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन श्रीकांत शिंदे आक्रमक