Instagram New Features : इन्स्टाग्रामने आपल्या डायरेक्ट मेसेजिंग ॲपमध्ये तीन नवीन फीचर्स (Instagram New Features) सादर केले आहेत. पाहिलं तर आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आता त्यांचे लाइव्ह लोकेशन मित्रांबरोबर शेअर करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त ते त्यांच्या मित्रांना टोपणनावसुद्धा देऊ शकतात. तसेच युजर्ससाठी ३०० हून अधिक नवीन स्टिकर्स लाँच करण्यात आले आहेत. ही सगळी फीचर्स स्नॅपचॅटशी स्पर्धा करण्यासाठी आणि युजर्सचा इन्स्टाग्राम वापरण्याचा अनुभव आणखीन खास करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. तर या तिन्ही फीचर्सबद्दल बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकेशन शेअरिंग (Location Sharing) :

इन्स्टाग्रामने एक नवीन फीचर सादर केले आहे(Instagram New Features), जे तुम्हाला तुमचे लाइव्ह लोकेशन मित्रांबरोबर डायरेक्ट मेसेज (DMs) मध्ये शेअर करण्याची परवानगी देणार आहे. तुम्ही तुमचे लोकेशन एक तासापर्यंत शेअर करू शकता, जे कॉन्सर्ट, कार्यक्रम किंवा कोणत्याही व्यग्र ठिकाणी भेटण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही एक तर तासभर तुमचे लाइव्ह लोकेशन शेअर करू शकता किंवा मित्रांसह प्लॅन करण्यासाठी लोकेशन पिन करून ठेवू शकता.

तुम्ही हे फीचर वापरता तेव्हा, फक्त तुमच्या खासगी संभाषणातील (पर्सनल चॅट) लोक तुमचे लोकेशन पाहू शकतात. इतर कोणाशीही लोकेशन शेअर करता येणार नाही. तुमच्या चॅटवर एक सूचना दिसून येईल; जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की, तुम्ही लोकेशन शेअर करत आहात आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही शेअरिंग थांबवूसुद्धा शकता. हे फीचर सध्या फक्त काही देशांमध्ये उपलब्ध आहे (Instagram New Features) .

हेही वाचा…How To Enable DND Services: स्पॅम कॉल, मेसेजचा वैताग आला आहे? मग अशी अ‍ॅक्टिवेट करा DND सर्विस

टोपणनाव (Nicknames) :

आता इन्स्टाग्राम चॅटमध्ये मित्र-मैत्रिणींशी बोलताना तुम्ही त्यांचे युजरनेम एडिट करून, त्यांच्या टोपणनावामध्ये बदल करू शकता. टोपणनाव तयार करण्यासाठी, मित्र-मैत्रिणींच्या चॅटमध्ये जा. प्रोफाइलमध्ये जाऊन “Nicknames” हा पर्याय निवडा. मैत्रिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील नावावर क्लिक करा आणि एडिट करून तुम्हाला हवं असलेलं नाव तिथे लिहा. मग Done वर क्लिक करा. ही टोपणनावे फक्त तुमच्या चॅटमध्ये दिसतील. त्यामुळे तुमचे इन्स्टाग्राम अकाउंटचे नाव बदलणार नाही. तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही तुमचे टोपणनाव बदलून पूर्वी असणारे नाव ठेवू शकता. तसेच चॅटमधील हे नाव कोण बदलू शकतं हेदेखील तुम्ही ठरवू शकता.

नवीन स्टिकर्स (New Stickers ) :

इन्स्टाग्रामने १७ नवीन स्टिकर्सचा पॅक आणला आहे; जो तुम्हाला चॅटमध्ये ३०० पेक्षा जास्त मजेदार स्टिकर्स वापरण्याची परवानगी देईल. तुम्ही स्टिकर्स चॅट करताना ते ‘सेव्ह’ करू शकता. त्यामुळे तुमच्या मित्रांनी शेअर केलेले किंवा तुम्ही स्वतः बनवलेले स्टिकर्स तुम्हाला पुन्हा वापरणे अधिक सोपे होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iinstagram new features user can assign nicknames to their friends able to share their live location asp