इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण इंस्टाग्रामने एक नवीन फीचरचा अ‍ॅपमध्ये समावेश केला आहे इंस्टाग्राम ने नुकतेच आपले ‘Notes’ हे नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते छोट्या छोट्या नोट्स बनवू शकतात. या बनवलेल्या नोट्स इंस्टाग्रामच्या DM सेक्शन मध्ये फॉलोवर्स स्टोरीज प्रमाणे बघू शकतील. या स्टोरीजला फॉलोवर्स जे काही रिएक्शन देतील ते तुम्हाला DM म्हणून दिसतील. या नवीन नोट्स फीचरचा मुख्य उद्देश म्हणजे नवीन पद्धतीने वेगवेगळी माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे आहे.

सध्या वापरकर्ते एकावेळी एकच नोट पोस्ट करू शकतात. ही नोट इंस्टाग्राम स्टोरी प्रमाणे २४ तासापर्यंत तुमच्या फॉलोवर्सना दिसेल आणि त्यानंतर ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल. इंस्टाग्राम नोट्स ला ६० अक्षरांची मर्यादा आहे.

आणखी वाचा : ‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक!

या फीचरचा या पद्धतीने वापर करा

  • सर्वप्रथम इंस्टाग्राम ॲप ओपन करा.
  • त्यानंतर इंस्टाग्राम वरील DM सेक्शन मध्ये जा.
  • तिथे तुम्हाला Your Note ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • ओपन झालेल्या पेजवर तुमच्या मनात जे काही असेल ते लिहा.
  • ही नोट तुम्हाला कोणासोबत शेअर करायची आहे ते देखील तुम्ही इथे निवडू शकता.
  • ही नोट कोणाला दाखवायची हे सिलेक्ट केल्यावर शेअर बटन वर क्लिक करा.
  • यानंतर तुमची नोट शेअर झालेली असेल.

या नोट्स फक्त २४ तासांसाठी असतील

इंस्टाग्राम स्टोरीज प्रमाणे या नवीन नोट्स फीचरची मर्यादा सुद्धा २४ तास आहे. नोट पोस्ट केल्यावर तुमचे फॉलोवर २४ तासापर्यंत ती नोट बघू शकतील आणि २४ तासानंतर ती नोट इंस्टाग्रामद्वारे डिलीट केली जाईल.