सप्टेंबर महिन्यात आयफोन १५ सिरीज लॉन्च झाली आहे. त्यात आयफोन १५ , आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ लॉन्च झाल्यामुळे Apple ने आयफोन १४ च्या किंमतीत कपात केली आहे. दरम्यान ८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल २०२३ सुरू होणार आहे. या सेलमध्ये आयफोन १४ ची किंमत आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्ट बऱ्याच वेळेपासून बिग बिलियन डेज सेल २०२३ मध्ये आयफोन १४ वर डिस्काउंट देण्याबाबत माहिती देत आहे. आयफोन १४ फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये केवळ २०,८९९ रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. नक्की या सेलमध्ये आयफोन १४ स्वस्तात खरेदी करण्यासाठी कोणकोणत्या ऑफर्स असणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयफोन १४ चे फीचर्स

आयफोन १४ सिरीज मागील वर्षी लॉन्च करण्यात आलेली सिरीज आहे. आयफोन १४ मध्ये आयफोन १३ मध्ये असलेल्या चिपसेटचाच सपोर्ट देण्यात आला आहे. आयफोन १३ प्रमाणेच आयफोन १४ मध्ये देखील नॉचसह ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळतो. ज्यात व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तसेच रिअर कॅमेरा सेटअपमध्ये देखील १२ मेगापिक्सलचा कॅमेरा वापरकर्त्यांना मिळतो. याबाबतचे वृत्त ने दिले आहे.

हेही वाचा : १०,३९९ रुपयात खरेदी करा iPhone 13! Flipkart ‘बिग बिलियन डेज’ सेलच्या आधीच भन्नाट ऑफर, पाहा प्लॅन

आयफोन १४ फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये केवळ २०,८९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. आयफोन १४ मागच्या वर्षी आयफोन १४ प्रो सह ७९,९०० रुपयांच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. सध्या आयफोन १४ अधिकृत स्टोअरवर ६४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सध्या आयफोन १४ अधिकृत स्टोअरवर४,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर ६४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास खरेदीदारांना आयफोन १४ वर ४ हजारांची सूट मिळू शकते. यामुळे आयफोन १४ ची किंमत ६०,९९९ रुपयांपर्यंत कमी होईल.

याशिवाय फ्लिपकार्टवर तुम्हाला जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ४०,१०० रुपयांची सूट मिळू शकते. सर्व ऑफर्स आणि बँक सवलतींसह, खरेदीदारांना Apple iPhone 1314 फक्त २०,८९९ मध्ये Flipkart वर बिग बिलियन डेज सेलआधी खरेदी करता येऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 14 buy 20899 rs flipkart big billion days sale hdfc credit card exchange check all offers and details tmb 01