scorecardresearch

Premium

१०,३९९ रुपयात खरेदी करा iPhone 13! Flipkart ‘बिग बिलियन डेज’ सेलच्या आधीच भन्नाट ऑफर, पाहा प्लॅन

Flipkart Big Billion Days Sale सुरु व्हायच्या आधीच आयफोन १३ फ्लिपकार्टवर विविध सवलतींमुळे अवघ्या १० हजारात खरेदी करता येऊ शकतो. हे कसं शक्य आहे याची आकडेमोड पाहूया..

Buy Apple Iphone 13 In Rupees 10 Thousand on Flipkart Big Billion Days Sale Check Amazing Offers and Finance plan EMI
आयफोन १३ फ्लिपकार्टवर अवघ्या १० हजारात खरेदी करण्यासाठीचा प्लॅन (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Apple iPhone 13 हा मागील वर्षी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सर्वाधिक विकला गेलेला फोन होता. अलीकडेच Apple iPhone 15 सुद्धा लाँच झाल्यानंतर iPhone 13 ची किंमत बरीच कमी झाली आहे. अगोदरच कमी झालेल्या दरांमध्ये आता अजून सूट मिळण्याची शक्यता आहे कारण 8 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट हा ‘Big Billion Days Sale 2023’ सुरू होत आहे. फ्लिपकार्टने शेअर केलेल्या टीझरनुसार, Apple iPhone 13 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत या सेलमध्ये उपलब्ध असेल. फ्लिपकार्टच्या टीझरमध्ये ३९,९९९ रुपये किंवा त्यापेक्षा कमी या फोनची किंमत असावी असा अंदाज येतो आहे पण नेमका आकडा टीझरमध्ये उघड केलेला नाही.

Apple iPhone 13 आता Apple अधिकृत स्टोअरवर उपलब्ध सर्वात स्वस्त फ्लॅगशिप आहे. २०२१ मध्ये iPhone १३ हा ७९,९०० या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता आणि सध्या तो Apple स्टोअरमध्ये ५९,००० रुपयात उपलब्ध आहे. मात्र सेल सुरु व्हायच्या आधीच आयफोन १३ फ्लिपकार्टवर विविध सवलतींमुळे अवघ्या १० हजारात खरेदी करता येऊ शकतो. हे कसं शक्य आहे याची आकडेमोड पाहूया..

honor 90 5g first sale started in amazon with offers
२०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या स्मार्टफोनचा सेल ‘या’ प्लॅटफॉर्मवर आजपासून सुरु; ऑफर्स एकदा पाहाच
WhatsApp Channel
आपले स्वतःचे WhatsApp चॅनेल कसे तयार करावे? ‘या’ सोप्या ट्रिक्सने होईल झटपट काम
iPhone 15, iPhone 15 pro, iPhone 15 pro max Booking Start in India
भारतात आजपासून iPhone 15 Series चे प्री बुकिंग सुरू; फोन कसा खरेदी करायचा? जाणून घ्या
poco x pro 5g big discount on flipkart
Poco च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट; जाणून घ्या हा फोन खरेदी करण्याची ४ कारणे

सध्या Apple स्टोअरच्या किमतीवर आणखी ७,४०१ रुपयांच्या सवलतीनंतर iPhone 13 फ्लिपकार्टवर ५२,४९९ रुपयात उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, खरेदीदारांना HDFC बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर २००० रुपये सूट मिळू शकते. Apple iPhone 13 ची किंमत ५०,९४९ रुपयांपर्यंत कमी होईल. याशिवाय जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात खरेदीदारांना ४०,१००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. सर्व ऑफर्स आणि बँक सवलतींसह, खरेदीदारांना Apple iPhone 13 फक्त १०,३९९ मध्ये Flipkart वर खरेदी करता येऊ शकतो.

Apple iPhone 13 मध्ये 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह नाईट मोडमध्ये 12MP TrueDepth फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन १७ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Buy apple iphone 13 in rupees 10 thousand on flipkart big billion days sale check amazing offers and finance plan emi svs

First published on: 03-10-2023 at 12:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×