अॅपल कंपनीने आयफोन १५ सिरीज काही दिवसांपूर्वी लॉन्च केली आहे. २२ तारखेपासून आयफोन १५ सिरीजची विक्री सुरू झाली आहे. आयफोन १५ सिरीजची विक्री भारतात देखील सुरू झाली आहे. आयफोन १५ सिरीजमधील बेस मॉडेलची किंमत ७९,९०० रुपये तर आयफोन १५ प्रो ची किंमत १,३४,९०० रुपयांपासून सुरु होते. किंमत जास्त असून देखील आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेल्सना जास्त मागणी आहे. अनेक वेबसाइट्स आयफोन १५ च्या खरेदीवर डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स देत आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.
Apple ऑफिशियल स्टोअर
जर का तुम्ही मुंबई
Amazon
आयफोन १५ खरेदी करण्यासाठी Amazon इंडिया हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. प्राइम वापरकर्ते २४ तासांच्या आतमध्ये आपल्या नवीन आयफोनची डिलिव्हरी मिळवू शकतात. Amazon आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही डिव्हाइसेससाठी अतिरिक्त डिस्काउंट ऑफर करतो.
Flipkart
नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट देखील एक चांगला पर्याय आहे. फ्लिपकार्ट Amazon प्रमाणेच अतिरिक्त बँक ऑफर्स ऑफर करते. तसेच तुम्ही फ्लिपकार्टवरून आयफोन खरेदी करत असताना कमीत कमी ३०० सुपरकॉइन कमवू शकता. जे प्लॅटफॉर्मवर इतर वस्तू खरेदी करताना रिडिम केले जाऊ शकतात.
हेही वाचा : iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ठिकाणी सुरू आहेत बेस्ट ऑफर्स; एकदा पाहाच
Blinkit
ब्लिंकिंट वेबसाइट मुंबई,दिल्ली आणि बंगळुरूसारख्या निवडक शहरांमध्ये आयफोन १५ सिरीजची विक्री करते. केवळ १० मिनिटांमध्ये नवीन आयफोन १५ देण्याचा दावा वेगळेपण दर्शवते. ब्लिंकिंट प्रीमियम अधिकृत पुर्नविक्रेता युनिकॉर्नच्या मदतीने बँक डिस्काउंट पण ऑफर करत आहे.
Apple चे अधिकृत पुनर्विक्रेते
तुम्ही देशातील कोणत्याही Apple कंपनीच्या अधिकृत रिसेलरकडून नवीन आयफोन १५ खरेदी करू शकता. यामध्ये युनिकॉर्न, Imagine, इंडिया स्टोअर, विजय सेल्सस, रिलायन्स डिजिटल आणि टाटा क्रोमा यांसारख्या स्टोअर्सचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी आयफोन खरेदीवर असणारी ऑफर्स आणि मिळणार डिस्काउंट वेगवेगळा असू शकतो. त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्टोअर्सशी संपर्क साधणे आवश्यक आहे हे लक्षात घेणे गरजचे आहे.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 15 series buy amazon flipkart apple official stores with best offers tmb 01