iPhone is from the year 2007 then its owner kept this phone in a sealed pack and now it is being sold after 16 years| BMW च्या किमतीत विकला जातोय 'हा' iPhone; ‘हे’ आहे यामागील खरं कारण | Loksatta

आश्चर्यकारक! BMW च्या किमतीत विकला जातोय ‘हा’ iPhone; ‘हे’ आहे यामागील खरं कारण

हा आयफोन इतका महागडा कां, जाणून घ्या कारण…

Apple iPhone
जुना iPhone अतिशय महागडा (Photo-financialexpress)

तुम्हाला जुना फोन घेण्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले तर तुम्ही तो विकत घ्याल का? उत्तर नाही असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशाच जुन्या फोनबद्दल सांगणार आहोत जो एक-दोन नव्हे तर तब्बल ४० लाख रुपयांना विकला जात आहे. आम्ही ज्या फोनबद्दल बोलत आहोत तो २००७चा iPhone आहे ज्याचा आता लिलाव होणार आहे.

या फोनचे मालक कॉस्मेटिक टॅटू आर्टिस्ट कॅरेन ग्रीन आहे, तिला हा फोन १६ वर्षांपूर्वी २००७ मध्ये भेट म्हणून मिळाला होता. त्याच वर्षी Apple ने आपला पहिला iPhone लाँच केला, जो त्या काळातील प्रगत वैशिष्ट्यांसह आला होता. यात ३.५ इंच टच स्क्रीन, २ मेगापिक्सेल कॅमेरा आणि सफारी वेब ब्राउझर सारखी वैशिष्ट्ये होती आणि त्यावेळी त्याच्या ४GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत $५९९ होती.

१५ वर्षांसाठी बॉक्समध्ये पॅक होता फोन

न्यू जनरेशनचा फोन मिळाल्याने कॅरनला आनंद झाला होता. पण तिने हा फोन उघडला नाही कारण तिच्याकडे Verizon सोबत तीन फोन लाइन्स आधीपासून होत्या आणि iPhones फक्त AT&T सोबत आले होते. त्यामुळे हा फोन रिटेल बॉक्समध्ये बराच काळ बंद राहिला. म्हणूनच जवळपास १५ वर्षांनंतरही, कॅरेन ग्रीनचा पहिला आयफोन अजूनही बॉक्समध्ये पॅक आहे.

(हे ही वाचा: ChatGpt चा नवा विक्रम, फेसबुक आणि गुगलला मागे टाकत कमी वेळात मिळवले १०० मिलियनहून अधिक यूजर्स)

लिलावात विकला जातोय फोन

आता या आयफोनचा लिलाव होणार आहे जिथे त्याची बोली किमान 50 हजार डॉलर्स (सुमारे 40.1 लाख रुपये) पर्यंत जाऊ शकते. हा लिलाव एलसीजी ऑक्शनद्वारे आयोजित केला जात आहे, जो गुरुवारपासून सुरू झाला आहे आणि 19 फेब्रुवारीपर्यंत चालेल. खरं तर, जेव्हा ग्रीनने Ebay वर $10,000 च्या किंमतीला सूचीबद्ध केलेला पॅक केलेला आयफोन पाहिला तेव्हा त्याने आपला फोन विकण्याचा निर्णय घेतला.

फोनची किंमत होती 50 हजार डॉलर्स

कॅरेन ग्रीन २०१९ मध्ये तिच्या आयफोनसह डेटाइम टीव्ही शो “Doctor & the Diva” मध्ये पोहोचली जिथे त्याची किंमत ५०,००० रुपये होती. फोनची किंमत पाहून ग्रीनने हा फोन आणखी दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला. फॅक्टरी सील केलेला फर्स्ट जनरेशन आयफोन $४०,००० ला विकताना पाहून यानंतर तिने हा आयफोन १६ वर्षांनंतर विकण्याचा निर्णय घेतला. २ फेब्रुवारी रोजी त्याचा लिलाव $२५०० पासून सुरू झाला आणि १९ फेब्रुवारीपर्यंत त्याची किंमत $५०,००० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 17:02 IST
Next Story
ChatGpt चा नवा विक्रम, फेसबुक आणि गुगलला मागे टाकत कमी वेळात मिळवले १०० मिलियनहून अधिक यूजर्स