Reliance Jio Launched Diwali Dhamaka Offer For Customers : दिवाळीसाठी काही दिवस उरले असून, अनेक कंपन्यांमध्ये ऑफर्स, सेलसाठी शर्यत सुरू आहे. काही कंपन्या सूट, कॅशबॅक, तर वस्तू अर्ध्या किमतीत देताना दिसत आहेत. अशातच आता रिलायन्स जिओने नवीन ‘दिवाळी धमाका’ (Diwali Dhamaka) ऑफर लाँच केली आहे; ज्यात त्यांच्या ८९९ रुपये आणि ३,५९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह विशेष फायदे देत आहेत. ही ऑफर २५ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन्हीपैकी कोणत्याही एका प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना इझी माय ट्रिप (EaseMyTrip), Ajio (अजिओ), स्विगी (Swiggy)सारख्या ब्रॅण्डसच्या ३,३५० रुपयांच्या व्हाउचरवर क्लेम करू शकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओच्या ८९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन ९० दिवसांसाठी वैध असणार आहे; ज्यामध्ये ग्राहकांना २जीबी दैनंदिन डेटा, अतिरिक्त २० जीबी बोनस, अमर्यादित व्हॉइस कॉल्स, १०० एसएमएस दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ३,५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस दिले जाणार आहेत. या फायद्यांव्यतिरिक्त रिलायन्स जिओ काही व्हाउचरदेखील (Diwali Dhamaka Offer) देत आहे. त्यासाठी जिओने इझी माय ट्रिप, स्विगी यांसारख्या लोकप्रिय ब्रँडबरोबर पार्टनरशिप केली आहे.

हेही वाचा…OpenAI’s First Chief Economist : OpenAIचे पहिले-वहिले मुख्य अर्थतज्ज्ञ! कोण आहेत आरोन चॅटर्जी? जाणून घ्या तीन मुद्द्यांमध्ये

इझी माय ट्रिप (EaseMyTrip) : या व्हाउचरमुळे तुम्हाला हॉटेल, विमान प्रवास बुकिंगवर ३००० रुपयांचे डिस्काउंट मिळेल.

अजिओ (Ajio) : ९०० रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर तुम्हाला २०० रुपये सूट दिली जाईल.

स्विगी (Swiggy) : जेवण ऑर्डर करण्यासाठी १५० रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर मिळेल.

रिचार्ज केल्यानंतर कूपन कसे मिळवायचे? (How to redeem Jio Diwali Dhamaka Coupons)

रिचार्ज केल्यानंतर MyJio ओपन करा.
त्यातील Offers सेक्शनमध्ये जा
सेक्शनमध्ये My winnings वर क्लिक करा.
येथे तुम्हाला तिन्ही कंपन्यांचे व्हाउचर कोड दिसतील. तुमच्या आवडीनुसार कूपन कोड निवडा आणि कॉपी करा.

तर अशाप्रकारे ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तुम्ही या दोन्ही रिचार्ज प्लॅन पैकी एक जरी रिचार्ज केलात तर तुम्हाला जबरदस्त फायदे (Diwali Dhamaka Offer) मिळू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio diwali dhamaka offer benefits with 8 and 35 prepaid recharge plans with easemytrip ajio and swiggy vouchers asp