Premium

फक्त २००० रुपयांमध्ये मिळणार Jio Phone 5G! जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचे ‘हे’ असतील फीचर्स

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ५जी सेवेसोबत Jio Phone 5G स्मार्टफोन देखील लाँच करू शकते.

Jio Phone 5G
Photo-File Photo

Jio Phone 5G: देशात ५जी सेवांचा शुभारंभ जसजसा जवळ येत आहे, त्याच प्रकारे टेलिकॉम कंपन्या आणि टेक ब्रँड्स देखील वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन उत्पादने आणि योजना घेऊन तयार आहेत. प्रत्येकजण सुपर फास्ट ५जी इंटरनेटची वाट पाहत आहे आणि लवकरच ५जी नेटवर्क कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय यांना त्यांचे ५जी स्पेक्ट्रम मिळाले आहे आणि ५जी रोलआउटचा मार्ग देशात आहे. दरम्यान, बातमी येत आहे की देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ५जी सेवेसोबत Jio Phone 5G स्मार्टफोन देखील लाँच करू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओ फोन 5G

4G फीचर फोन Jio Phone आणि Google च्या सहकार्याने बनवलेल्या 4G स्मार्टफोन Jio Phone Next नंतर आता अंबानींची कंपनी Reliance Jio देखील स्वतःचा ५जी फोन आणू शकते अशी चर्चा आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये ५जी नेटवर्कला सपोर्ट करणाऱ्या Jio Phone 5G चा उल्लेख केला जात आहे. लीक्समध्ये या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स देखील शेअर केले जात आहेत. कंपनीच्या इतर मोबाईल फोन्स प्रमाणे हा देखील कमी किमतीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: ३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone 13! लवकरच घरी आणा तुमच्या स्वप्नातला फोन)

Jio Phone 5G ची किंमत

4G फीचर फोन JioPhone आणि 4G स्मार्टफोन JioPhone Next प्रमाणे, 5G मोबाईल JioPhone 5G देखील कमी बजेटमध्ये भारतात आणला जाईल. भारतातील सर्वात स्वस्त ५जी फोन म्हणून तो लाँच होणार असल्याची चर्चा आहे. फोनची प्रत्यक्षात किंमत काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार JioPhone 5G ची किंमत १२,००० रुपये सांगितली जात आहे, जी Jio 5G प्लॅन्ससोबत फक्त २,००० रुपयांमध्ये मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, Jio Phone 5G स्मार्टफोन कंपनीच्या बंडल ऑफरसह उपलब्ध असेल. या फोनसोबत काही Jio 5G प्लॅन देखील ऑफर केले जातील. या जिओ प्लॅन्सच्या रिचार्जवर, वापरकर्त्यांना Jio Phone 5G ची इफेक्टिव किंमत फक्त २,००० रुपये मिळेल आणि इतर पैसे ५जी रिचार्ज प्लॅन आणि ५जी डेटा शुल्कासह भरता येतील.

( हे ही वाचा: चिनी कंपन्यांना सरकार देणार झटका! १२ हजारांपर्यंतच्या स्मार्टफोनवर भारतात असेल बंदी)

Jio फोन 5G चे स्पेसिफिकेशन

  • ६.५ एचडी + डिस्प्ले
  • ४जीबी रॅम
  • ३२जीबी स्टोरेज
  • Pragati ओएस
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० ५जी
  • १३एमपी+ २एमपी मागील कॅमेरा
  • ८ एमपी सेल्फी कॅमेरा

Jio Phone 5G कंपनीच्या ४जी स्मार्टफोन Jio Phone Next पेक्षा फारसा वेगळा असणार नाही आणि त्याचे मुख्य अपग्रेड फोनमध्ये उपस्थित असलेले ५जी बँड असेल. Jio Phone 5G मध्ये १६०० x ७२० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो IPS LCD पॅनेलवर तयार केला जाईल. फोनमध्ये ६०Hz रिफ्रेश रेट पाहता येईल आणि स्क्रीनला ग्लास प्रोटेक्शन देखील दिले जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, JioPhone 5G चा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असेल.

( हे ही वाचा: 4G सिमवर 5G सेवा उपलब्ध असेल का? की नवीन सिमची आवश्यकता असेल? जाणून घ्या सविस्तर)

JioPhone 5G मध्ये प्रगती OS दिली जाऊ शकते जी आपण JioPhone Next मध्ये पाहिली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम गुगलने खासकरून भारतीय मोबाइल वापरकर्त्यांसाठी तयार केली आहे, ज्यामध्ये भारतीय भाषांनाही सपोर्ट आहे. तसंच, प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये Qualcomm Snapdragon ४८० चिपसेट दिला जाऊ शकतो. Jio Phone 5G बद्दल सांगितले जात आहे की हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम मेमरी वर लाँच केला जाईल, ज्यामध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाईल. फोनमधील इंटरनल मेमरी कमी असेल पण फोनमधील स्टोरेज वाढविण्यासाठी त्यात एक्सटर्नल मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

JioPhone 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरे असण्याची चर्चा समोर आली आहे. लीक्सनुसार, हा ५जी फोन २ मेगापिक्सलच्या दुय्यम लेन्ससह १३ मेगापिक्सलच्या प्राथमिक सेन्सरला सपोर्ट करेल. हा दुय्यम सेन्सर मॅक्रो लेन्स असू शकतो. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. JioPhone 5G च्या बॅटरीचा तपशील अद्याप कोणत्याही लीक किंवा अहवालात उघड झालेला नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jio phone 5g will be available for rs 2000 only know the features gps

First published on: 17-08-2022 at 19:04 IST
Next Story
Qualimate Tablet : केवळ २७५ रुपयांमध्ये भन्नाट टॅब; इंटरनेट कनेक्शनशिवायही वापरता येणार