सध्याच्या डिजिटल युगात लॅपटॉप हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. आजकाल लॅपटॉप शाळेत जाणाऱ्या मुलांपासून जॉबला जाणाऱ्या व्यक्तीकडे आपणाला पाहायला मिळतो. कारण, आपली अनेक कामं लॅपटॉपवर अवलंबून असतात. लॅपटॉप जसा आपल्यासाठी आवश्यक आहे, तशी त्याची स्वच्छता करणं हे लॅपटॉपसाठी आवश्यक असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण, आपण ऑफिसमध्ये काम करत असू किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ करत असू तरी लॅपटॉप आणि त्याचे कीबोर्ड अस्वच्छ झाल्याचं आपणाला दिसतं. कीबोर्डमध्ये आसपासची धूळ, आपल्या बोटांचा घाम, काम करताना आपण खाल्लेल्या बिस्किटांचे चिप्सचे छोटे-छोटे कण किंवा डोक्याचे केस अनेकवेळा अडकतात आणि त्यामुळे कीबोर्ड खराब होण्याची शक्यता असते.

हेही वाचा- प्रवाशांसाठी खुशखबर! विमान प्रवासादरम्यान वापरता येणार मोबाईल, Airplane Mode होणार भूतकाळात जमा; कारण…

त्यासाठी आपणाला ती घाण वेळीच स्वच्छ करावी लागते, पण कीबोर्ड चुकीच्या पद्धतीने स्वच्छ केला तरी नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कीबोर्ड आणि लॅपटॉपचं काही नुकसान होऊ नये यासाठी ते स्वच्छ करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. ती काळजी तुम्ही कशी घ्याल याबाबत तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. तर चला जाणून घेऊया कीबोर्डला नुकसान न पोहोचवता तो कसा स्वच्छ करायचा.

कीबोर्डवर दाब देऊ नका –

लॅपटॉपच्या कीबोर्डवर जास्तीचा दाब पडला किंवा साफ करताना आपल्याकडून त्याची बटणं चुकीच्या पद्धतीने आणि जोरात दाबली गेली तर त्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशा वेळी कोणतं साहित्य वापरायचं आणि कसं वापरायचं हे माहिती असणं महत्त्वाचं आहे.

मऊ कापड –

हेही वाचा- स्वयंपाक करताना अचानक गॅस संपण्याची भीती? आता व्हा टेंशन फ्री, जाणून घ्या शिल्लक गॅस ओळखण्याच्या सोप्या पद्धती

लॅपटॉप साफ करताना सर्वात पहिलं तर लॅपटॉप बंद करा. त्यानंतर दोन्ही हातांनी तो अलगद पकडून उलटा करा आणि थोडा हलवा त्यामुळे बटनांच्या खाचांमध्ये अडकलेली घाण निघून पडेल. त्यानंतर मायक्रोफायबर कापड, मऊ पेंटब्रश, मऊ कापड आणि बाजारात मिळणारा कीबोर्ड क्लिनर हे साहित्य कीबोर्ड साफ करण्यासाठी वापरा.

हे सामान आणल्यानंतर सर्वात पहिलं लॅपटॉप चांगल्या पद्धतीने पकडा. त्यानंतर मायक्रोफायबर कापड, मऊ पेंटब्रश किंवा कोणत्याही कॉम्प्रेस्ड एअर गॅझेटच्या मदतीने लॅपटॉप स्वच्छ करायला सुरुवात करा. मात्र, यावेळी जास्तीचा जोर त्या बटणांवर देऊ नका. अलगद आणि हलक्या हातांनी लॅपटॉप साफ करा.

हेही वाचा- Gmail मध्ये नको असलेल्या Mail मुळे त्रस्त आहात? जाणून घ्या ब्लॉक करण्याच्या सोप्या स्टेप्स

लिक्विड क्लीनर –

दरम्यान, बाजारात कीबोर्ड साफ करण्यासाठी लिक्विड कीबोर्ड क्लीनर उपलब्ध आहे. मात्र त्याचा वापर अतिशय काळजीपुर्वक करावा लागतो. या क्लिनरची कीबोर्डवर थेट फवारणी करू नका कारण हे लिक्विड थेट लावल्यास लॅपटॉपचे सर्किट खराब होण्याचा धोका असतो. त्यासाठी लॅपटॉप साफ करताना एक स्वच्छ मऊ कापड घ्या, त्यावर थोड्या प्रमाणात ते क्लिनर घ्या आणि ते मऊ कापडाच्या मदतीने लॅपटॉप आणि किबोर्ड स्वच्छ करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laptop dusty use these simple cleaning tips to clean jap
First published on: 05-12-2022 at 20:40 IST