lava launched lava blaze 5g phone with many features | Loksatta

लावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर

फोन घेताना ग्राहक ५ जी फोनला पसंती देत आहेत. दरम्यान ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लावाने आपला ५ जी फोन भारतात लाँच केला आहे. फोनची किंमत सुमारे १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

लावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर
लावा (source – lava)

देशात ५ सेवेचा शुभारंभ झालेला आहे. ५ जी सेवा ४ जी पेक्षा १० पट वेगाने इटरनेट सेवा देईल, असे सांगितल्या जाते. ही सेवा गेमिंग, ऑनलाईन व्हिडिओ आणि इतर कार्यात फायदेशीर ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आता फोन घेताना ग्राहक ५ जी फोनला पसंती देत आहेत. दरम्यान ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लावाने आपला ५ जी फोन भारतात लाँच केला आहे. फोनची किंमत सुमारे १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

भारतीय कंपनी लावा इंटरनॅशनलने सोमवारी आपला पहिला ५ जी स्मार्टफोन देशात लाँच केला. या फोनची किंमत १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. फोनची प्री बुकिंग दिवाळीच्या आसपास सुरू होणार आहे. किफायतशीर किंमतीमध्ये ग्राहकांना ५ जी स्मार्टफोन देण्याच्या कंपनीच्या दृष्टीकोनाशी हे उत्पादन जुळलेले आहे, असे लावा इंटरनॅशनल कंपनीचे आध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुनील रैना यांनी एका निवेदनात सांगितले.

(Google translate : गुगलने चीनमध्ये बंद केले ‘गुगल ट्रान्सलेट’, ‘हे’ आहे कारण)

फोनचे फीचर

Lava Blaze 5G फोनला मागे ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच चांगली सेल्फी काढण्यासाठी फोनच्या पुढील भागात ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गतिमान कार्यासाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० चिपसेट देण्यात आले आहे. तर फोनमध्ये ४ जीबी रॅमसह ३ जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे.

फोनमध्ये १२८ जीबीची इंटरनेल स्टोरेज मिळत आहे. दीर्घकाळ काम करता यावे यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये साईड माउन्टेड वेगवान फिंगर प्रिंट अनलॉक फिचर देखिल देण्यात आले आहे.

(१०८ एमपी कॅमेरा आणि गतिमान प्रोसेसरसह लाँच झाला Moto G 72, पण ‘हा’ महत्वाचा फीचर नाही)

नवीन तंत्रज्ञान सर्वांना वापरता यावे यासाठी हा या ५ जी फोनचा हेतू आहे, असे मीडियाटेक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अंकू जैन म्हणाले. दरम्यान लावाच नव्हे तर आता अनेक कंपन्या बाजारामध्ये परवडणाऱ्या किंमतीत ५ जी फोन्स लाँच करत आहेत. या फोन्समध्ये अनेक फीचर आहेत. यांना भारतातच बनवलेला हा लावा फोन जोरदार आव्हान देईल का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Google translate : गुगलने चीनमध्ये बंद केले ‘गुगल ट्रान्सलेट’, ‘हे’ आहे कारण

संबंधित बातम्या

घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा, 8 जीबी रॅम आणि बरेच काही
विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?
Heating Lamp In Winters: थंडीपासून बचाव करेल ‘हा’ बल्ब; मिनिटांत करतो घर गरम, किंमत फक्त…
OnePlus 10 Pro 5G vs Samsung Galaxy S22: या दोनपैकी कोणता फोन बेस्ट आहे, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
VI कडून दोन वर्षांसाठी भन्नाट ऑफर; जाणून घ्या नेमका कोणाला आणि कसा घेता येणार याचा फायदा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले, “अधिवेशनापूर्वी…”
काय त्या गाड्या… काय त्यांचा वेग!; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची एकच चर्चा
Mercedes Benz EQB Car Launch: कार्यक्रमात एमएस धोनीचा मनाला स्पर्श करणारा सल्ला; म्हणाला, ‘सर्वात आधी तुमची कमाई…’
“लहानपणापासून मला…” सनी लिओनीने सांगितलं ‘Splitsvilla’च्या सूत्रसंचालनासाठी होकार देण्यामागचं कारण
नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश