शाओमीने MWC २०२३ मध्ये स्मार्टफोन तयार करण्यासाठी जर्मनीमधील कॅमेरा मेकर कंपनी Leica बरोबर पार्टनरशिप केली होती. Leica त्याच्या उत्तम कॅमेऱ्यांसाठी ओळखले जातात आणि गुणवत्ता राखण्यावर भर देतात आणि बजेट स्मार्टफोनसाठी तडजोड करत नाहीत. तर शाओमीबरोबर भागीदारी करून फोन कॅमेऱ्यांमध्ये “Leica लूक” आणण्याचे Leica चे उद्दिष्ट आहे. Leica शाओमीबरोबर त्यांचे आयकॉनिक कॅमेरा स्मार्टफोनमध्ये आणण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

बार्सिलोना येथील मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये घोषणा करण्यात आलेल्या शाओमी १४ सीरिज (Xiaomi 14) सारख्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सवरील कॅमेरे फाइन-ट्यून करण्यासाठी शाओमीबरोबर सहयोग करणाऱ्या Leica कंपनीसाठी ‘लेईका लूक’ तयार करणे हे नेहमीच एक ध्येय होते. Plaetke कंपनीच्या Wetzlar, जर्मनी येथील मुख्यालयात इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, स्मार्टफोन्ससारख्या लहान आणि अधिक कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये आमची गुणवत्ता कशी आणू शकतो, याचा आम्ही सुरुवातीपासून विचार करतो. त्यामुळे आम्ही लवकरच स्मार्टफोनसाठी वन इंच सेन्सरवर काम करत आहोत.

नवीन सीरिज १४ च्या स्मार्टफोनमध्ये शाओमी (Xiaomi) आणि Leica द्वारे विकसित केलेल्या विविध इमेजिंग सिस्टीम आहेत, ज्यात एफ / १.६३ ते एफ/ ४.० मधील (f/1.63 ते f/4.0) एक इंच सेन्सर व्हेरिएबल ॲपर्चरसह टॉप-एंड मॉडेलचा समावेश आहे. लेईका स्मार्टफोनच्या कॅमेरा सिस्टीमचे हार्डवेअर कॅमेरा/लेन्स विकसित करतात.

हेही वाचा…आता Truecaller मध्ये करा कॉल रेकॉर्ड; ‘या’ युजर्सना मिळेल फायदा; फक्त या स्टेप्स करा फॉलो

लेईकाकडे फोटोची गुणवत्ता मोजण्यासाठी पॅरामीटर्स, चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत. तसेच येथे काम करणारे कर्मचारी बाहेरच्या देशात जातात आणि नवीन डिव्हाइससह अनेक फोटो क्लिक करतात. नंतर तुलना करून फरक ओळखण्याचा प्रयत्न करतात. कॅमेरा आणि फोटोमागील विज्ञान आपण फोन कॅमेरा विरुद्ध कॅमेरा कसे हाताळतो यापेक्षा वेगळे नाही; फक्त हे ओळखण्यात जर्मन कॅमेरा निर्मात्याला Leica ला अनेक वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही फोटो कसा काढता, त्यात काय वेगळं आहे, या सर्व फॉर्म फॅक्टरचे तुम्ही कसे निरीक्षण करता; हे समजून घेणे स्मार्टफोनवरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे स्पष्टीकरण लेईका येथील उत्पादन व्यवस्थापन मोबाइलचे प्रमुख ज्युलियन बुर्कझिक यांनी दिले.

शाओमीने व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन्सच्या निर्मितीमध्ये आपले नाव कमावले असले तरी, कंपनी आता नवीन १४ सीरिजसह high-end फोन मार्केटमध्ये आपले लक्ष वळवत आहे. शाओमी लेईकासह भागीदारीद्वारे सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्ससह toe-to-toe जाण्यास तयार दिसते आहे. शाओमीचे स्मार्टफोन्स भारतासारख्या बाजारपेठेत Apple आणि Samsung ला टक्कर देण्यासाठी हाय रेंजसारख्या उपकरणांच्या बाजारपेठेत प्रवेश करू पाहत आहेत, जिथे प्रीमियम फोनची विक्री जास्त होते.

स्मार्टफोन कॅमेऱ्यांमध्ये Leica चा सहभाग असूनही शाओमी केवळ सीरियस फोटोकडे पाहत नाही, तर कॅज्युअल फोटोला आकर्षित करण्याचा विचार करत आहे. ग्राहकांनी याचा अनुभव घ्यावा आणि हे संपूर्ण colour science शोधून काढावे अशी कंपनीची इच्छा आहे. त्यामुळे लेईका ब्रँडेड शाओमी स्मार्टफोन कॅमेऱ्यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो आहे. “कंपनीला लेईका ब्रँडच्या फायद्यांचे मार्केटिंग करण्यासाठी योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे. कारण ते शाओमी १४ सीरिजला मास-मार्केट फ्लॅगशिप आणि एक विशिष्ट उपकरण दोन्ही म्हणून स्थान देत आहे” , असे शाओमी इंडियाचे सीएमओ (CMO) अनुज शर्मा म्हणाले आहेत.”