चीनी टेक कंपनी लेनोव्हाने आपल्या सीरिजमध्ये आणखी एक दमदार टॅबलेट भारतीय बाजारात आणला आहे. लेनोव्हाने २९ ऑगस्ट २०२२ रोजी भारतात आपला नवीन टॅबलेट सादर केला. कंपनीने आपल्या नवीनतम पोर्टफोलिओमध्ये Tab M10 Plus (3rd Gen) चा समावेश केला आहे. नवीन लाँच झालेल्या Android टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेट आहे. या टॅबलेटला १०.६१ इंच 2K IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, या डिव्हाईसमध्ये पॉवरफुल प्रोसेसरसह सर्वोत्तम मल्टीमीडिया अनुभव मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॅबलेटचे स्पेसिफिकेशन्स

Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) मध्ये १०.६१ इंच 2K IPS LCD डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो १५:९ आहे आणि रिझोल्यूशन २,०००x १,२०० पिक्सेल आहे. या टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेट देण्यात आला आहे. या लेनोवो टॅबलेटमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

आणखी वाचा : स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! OnePlus घेऊन येणार ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास…

Lenovo Tab M10 Plus चे वजन सुमारे ४६५ ग्रॅम आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, लेनोव्हाच्या या नवीन टॅबलेटमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रियर कॅमेरा आहे. या टॅबलेटला पॉवर देण्यासाठी ७७००mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Lenovo Tab M10 Plus वर ४ तासांचा स्टँडबाय वेळ, ६० तासांचा म्युझिक प्लेबॅक वेळ, १२ तासांपर्यंत ऑनलाइन व्हिडीओ प्लेबॅक आणि १४ तासांपर्यंत वेब ब्राउझिंग वेळ प्रदान करण्याचा दावा केला जातो. हे टॅबलेट स्टॉर्म ग्रे आणि फ्रॉस्ट निळा रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

किंमत

Lenovo Tab M10 Plus फक्त Wi-Fi आणि LTE प्रकारात सादर करण्यात आला आहे. केवळ वाय-फाय व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, LTE वेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे. हा नवीन Lenovo Android टॅबलेट Amazon India आणि Lenovo च्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. याशिवाय हा टॅब ऑफलाइन स्टोअरमधूनही खरेदी करता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lenovos new tablet launch pdb
First published on: 30-09-2022 at 15:47 IST