सध्या स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. शाळा, कॉलेज, ऑफिसमधील अनेक महत्वाच्या कामांसाठी स्मार्टफोनचा उपयोग हा होतोच. त्यामुळे एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना त्याचा कॅमेरा, डिस्प्ले, रॅम, स्टोरेज, महत्त्वाचे म्हणजे बॅटरी लाइफ आदी अनेक गोष्टी आवर्जून पाहिल्या जातात. एखादे काम करताना चार्जिंग संपल्यामुळे काम अडकून राहते; तर प्रवासादरम्यान चार्जिंग संपल्यास स्मार्टफोन स्विच ऑफसुद्धा होतो. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना त्याची बॅटरी लाइफ दीर्घकाळ चालणारी आहे का हे तपासून घेणे आपल्या प्रत्येकासाठी फायदेशीर ठरेल.

तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्मार्टफोन्सची यादी सादर करणार आहोत. २५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या सर्व स्मार्टफोन्सची बॅटरी लाइफही उत्तम आहे.

१. वनप्लस नॉर्ड सीई४ (OnePlus Nord CE4) –

वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये ५,५०० mAh बॅटरी पॅक आहे. त्यामध्ये १०० डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टदेखील आहे; जो फक्त ३० मिनिटांत तुमचे डिव्हाइस पूर्णपणे चार्ज करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 SoC, ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज यांसारखी फीचर्स आहेत. तसेच या स्मार्टफोनची किंमत फक्त २४,९९९ रुपये आहे. बँक ऑफरसह एखाद्याला डिव्हाइसवर अतिरिक्त सवलत मिळू शकते. नवीन Android 14 आधारित OxygenOS 14 सह हा फोन पाठविला जातो.

२. ऑनर एक्स ९ बी ५ जी (Honor X9b 5G) –

ऑनरच्या या स्मार्टफोनमध्ये ५,८०० mAh बॅटरी पॅक आहे. पण, हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करीत नाही. ३५ डब्ल्यू चार्जिंग सपोर्टसह हे डिव्हाइस पूर्णपणे चार्ज होण्यासाठी जवळजवळ दोन तास लागतात. या स्मार्टफोनचीही किंमत २४,९९९ रुपये आहे.

३. सॅमसंग गॅलॅक्सी एफ ५४ ५जी (Samsung Galaxy F54 5G) –

सॅमसंगचा हा स्मार्टफोन ६,००० mAh बॅटरीसह येतो. हा स्मार्टफोन २५ डब्ल्यू चार्जिंगला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन चार्ज होण्यास दोन तास लागत असले तरी त्याची बॅटरी लाइफ पूर्ण दिवस टिकून राहू शकते. तसेच या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची किंमत २२,९९९ रुपये आहे.

हेही वाचा…एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?

४. मोटोरोला जी ५४ (Motorola G54) –

तुम्ही २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा व उत्तम बॅटरी लाईफ असणारा स्मार्टफोन शोधत असाल, तर Motorola G54 हा एक चांगला पर्याय आहे. १८,९९९ रुपयांच्या किमतीचे हे डिव्हाइस 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करते आणि ६,००० mAh बॅटरी लाइफ देते. तसेच लवकरच 6,000 mAh बॅटरीला सपोर्ट करणारा मोटोरोलाचा जी ६० (G64) स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे.

५. इंटेल पी४० प्लस (itel P40+) –

itel P40+ हा स्मार्टफोन ७,००० mAh बॅटरी लाईफसह येतो. या स्मार्टफोनची बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकून राहू शकते. तसेच या स्मार्टफोनची किंमत फक्त ८,५०० रुपये आहे.

तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही स्मार्टफोन निवडू शकता. वनप्लस नॉर्ड सीई ४, Rounded स्मार्टफोन आहे. तर ऑनर एक्स ९ बी ५ जी लेदर बॅक आणि वक्र डिस्प्लेसह प्रीमियम डिझाइन ऑफर करतो. त्याउलट सॅमसंग गॅलॅक्सी एफ ५४ ५जी UI आणि विस्तारित सॉफ्टवेअरला सपोर्ट करतो. मोटोरोला कंपनी उत्तम बॅटरी लाइफसह स्टॉक Android ऑफर करते. तर, Itel P40+ एका चार्जवर दिवसभर बॅटरी लाइफ टिकून ठेवण्यास मदत करील. अशी या स्मार्टफोन्सची खास वैशिष्ट्ये आहेत.