‘चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्म’ अर्थात ‘चॅट जीपीटी ही अमेरिकेतील ओपन एआय या संशोधन प्रयोगशाळेची निर्मिती आहे. जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. ‘चॅट जीपीटी’ लाँच झाल्यानंतर व्हायरल एआय चॅटबॉटमागील कंपनी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांना लोकप्रियता मिळाली. पण, यादरम्यान ओपन एआय आणि चॅट जीपीटी विरुद्ध बोलणारी केवळ एकच व्यक्ती होती, ती म्हणजे ‘एलॉन मस्क’.
Chat GPT ची कौशल्ये पाहून त्यांनी OpenAI वर फायद्याची कंपनी बनवल्याबद्दल टीका केली. तर चॅट जीपीटी आणि बार्डसारख्या एआय चॅटबॉट्सशी स्पर्धा करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एलॉन मस्कने स्वतःचा AI चॅटबॉट जगासमोर आणला. त्यांनी स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI तयार केली आहे त्यांच्या AI चॅटबॉटला ग्रोक (GrokAI) असे नाव दिले. एक्स (ट्विटर) X Premium आणि प्रीमियम प्लस (Premium+) वापरकर्त्यांद्वारे या चॅटबॉटमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.
हेही वाचा…आनंदाची बातमी! आता सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये येणार AI फीचर्स; पाहा संपूर्ण यादी
तर आता एलॉन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI अनेक भूमिकांसाठी काम करत आहे आणि एलॉन मस्क इच्छुक उमेदवारांना या उपक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहेत. डिझायनर, इंजिनिअर ते AI ट्यूटर आणि डेटा व्यावसायिकांपर्यंत, xAI टीमममध्ये काम करणाऱ्यांसाठी इच्छुक उमेदवाराना अनेक संधी आहेत. “आम्ही डिझायनर, इंजिनिअर, प्रोडक्ट, डेटा, इन्फ्रा आणि एआय ट्यूटर्ससाठी काम करणाऱ्या उमेदवारांना आमंत्रित करत आहोत – आमच्यात सामील व्हा! https://x.ai/careers “; असे कंपनीच्या अलीकडील ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
दरम्यान, xAI कंपनीने ट्विट शेअर करीत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “कंपनी एआय सिस्टीम तयार करण्याच्या मोहिमेवर आहेत, ज्यामुळे मानवतेला जग अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. तुम्हाला एआय मॉडेल्स आणि उत्पादनांच्या पुढील पिढीला आकार द्यायचा असेल तर आमच्यात सामील व्हा. आम्ही कामाच्या संधी देण्यास इच्छुक आहोत”; असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच ही पोस्ट रिपोस्ट करत एलॉन मस्कने लिहिले, “@xAI मध्ये सामील व्हा!”. सोशल मीडियावर ही पोस्ट एलॉन मस्क यांच्या @elonmusk यांच्या एक्स (ट्विटर) आणि @xai कंपनीच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच एलॉन मस्क यांच्या ट्विटला १४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि एक्स (ट्विटर) युजर्स xAI बद्दल कमेंटमध्ये बोलतानाही दिसून आले आहेत.