Message Yourself Feature for Users : युजरचा मेसेजिंगचा अनुभव चांगला होण्यासाठी अलिकडे व्हॉट्सअ‍ॅप अनेक फीचर उपलब्ध करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढवून ती १ हजारावर केली आहे, तर ग्रुपचे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी म्युट फीचर देखील सादर केले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने ‘मेसेज युअरसेल्फ’ हे फीचर लाँच केले आहे. या फीचरद्वारे तुम्हाला नोट्स पाटवता येईल आणि रिमाइंडर्स तयार करता येईल. या फीचरद्वारे युजरला स्वत:ला छायाचित्र, व्हिडिओ, मेसेजेस आणि ऑडिओ पाठवता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअ‍ॅपचे ‘मेसेज युअरसेल्फ’ हे फीचर आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही स्मार्टफोन्स युजर्ससाठी उपलब्ध होईल. येत्या आठवड्यांमध्ये हे फीचर प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप युजरसाठी उपलब्ध केले जाणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. त्यामुळे, या फीचरसाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.

(आता घर होईल थिएटर; ‘हे’ 3 मिनी प्रोजेक्टर्स साडेतीन हजारांच्या आत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर)

व्हॉट्सअ‍ॅपचे ‘मेसेज युअरसेल्फ’ फीचर कसे वापरायचे?

मेसेज युअरसेल्फ (Massage Yourself) फीचर मिळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून अपडेट करा. अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि क्रिएट न्यू चॅटवर क्लिक करा, तुम्हाला कॉन्टॅक्ट यादीमध्ये स्वत:चा क्रमांक दिसून येईल. तुमचा क्रमांक निवडा आणि मेसेज पाठवा.

मेसेज युअरसेल्फ फीचरद्वारे युजरला स्वत:ला नोट्स शेअर करता येतील आणि अ‍ॅपमधील इतर चॅट्समधील मल्टीमीडिया फाईल किंवा मेसेज देखील शेअर करता येईल. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करता येईल, छायाचित्रे काढता येईल आणि ते तुमच्यासाठी सेव्ह करता येऊ शकतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Message yourself feature launched by whatsapp for users ssb
First published on: 28-11-2022 at 17:15 IST