मोबाइल वापरण्याची मजा आणखी वाढणार; Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनसाठी आले MIUI 14 अपडेट

MIUI 14 अपडेटमुळे xiaomi users ना डिव्हाईस वापरतानाचा चांगला अनुभव मिळणार आहे.

Xiaomi Redmi poco smartphones miui 14 update
Xiaomi स्मार्टफोमनमध्ये नवे MIUI 14 अपडेट (mi.com website)

Xiaomi कंपनीकडून अनेक जबदरस्त मोबाईल लाँच केले जात आहेत. यातील अनेक मोबाईल युजर्सची चांगली पसंत मिळते. अशात Xiaomi ने अलीकडेच Xiaomi 13 Pro मध्ये Android 13 आधारित MIUI 14 अपडेट लाँच केले आहे. हे अपडेट Xiaomi, Redmi आणि Poco च्या स्मार्टफोन्सच्या इतर फोनमध्येही वापरता येणार आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

लवकरचं Xiaomi 12 Pro, Mi 11 Ultra, Mi 11X Pro 5G, Mi 11T Pro, Redmi Note 12 Pro+ 5G, Mi 11X, Redmi Note 12 Pro 5G, Redmi K50i 5G, Xiaomi 11 Lite आणि NE5G यांसारख्या मोबाईल्समध्ये हे अपडेट मिळू शकणार आहे. यात Redmi 11 Prime 5G चाही समावेश आहे

युजर्सना MIUI 14 मध्ये Enlarge Folder ची सुविधा मिळते. ज्यातून युजर्सना फोल्डरचा आकार वाढवता येतो. आत्तापर्यंत तुम्ही होम स्क्रीनवरुन फोल्डर हटवू शकत होतो किंवा ओपन करुन शकत होतो. पण या नव्या अपडेटमुळे तुम्हाला फोल्डरचा आकार वाढवण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे. यासह तुम्ही मोबाईलमधील प्री-इंस्टॉल अॅप देखील हटवू शकता.

iPhone युजर्ससाठी आले IOS 16.4 अपडेट; मिळणार ‘हे’ जबरदस्त फिचर्स, जाणून घ्या डाउनलोडिंग प्रोसेस

Android 13 आधारित MIUI 14 मध्ये पॉकेट मोड देण्यात आला आहे. जेणेकरून मोबाईल खिशात असताना तो खराब होणार नाही. याशिवाय MIUI 14 मध्ये 6 नवीन वॉलपेपर देण्यात आले आहेत. यासोबतच कंपनीने सेटिंग मेनू देखील पूर्वीपेक्षा अधिक क्लीन आणि व्यवस्थित केला आहे.

Xiaomi च्या नवीन अपडेटमध्ये म्हणजेच MIUI 14 मध्ये, तुम्ही फोटोमधील मजकूर कॉपी करू करणार आहात. या प्रकारची सुविधा सॅमसंग, ऍपल आणि गुगल फोनमध्ये आधीपासूनचं होती.

नवीन अपडेटमुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही फोटोवर वॉटरमार्क टाकू शकता. याशिवाय इमेजमधून ऑब्जेक्ट, शॅडो किंवा पिक्चर डिलीट करू शकता म्हणजे ऑब्जेक्ट डिलीट करण्याचे ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

ज्याप्रमाणे कट आउट फीचर iOS 16 मध्ये उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे Xiaomi च्या MIUI 14 मध्ये देखील हे फीचर देण्यात आले आहे. यामुळे तुम्ही कोणताही फोटो बॅकग्राऊंडपासून वेगळा करु शकता. या नवीन अपडेटमध्ये तुम्हाला ड्युअल फ्लोटिंग विंडो, कॉम्प्रेस व्हिडिओ क्लॉलिटी आणि व्हिडिओ एडिट करण्यासाठी प्रो मोड ऑप्शन मिळाले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 12:26 IST
Next Story
चॅटजीपीटीमुळे ‘या’ क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड? OpenAI चे सीईओ म्हणाले, “जी लोकं…”
Exit mobile version