Apple ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी आयफोन,मॅकबुक किंवा असे अनेक गॅजेट्स कंपनी लॉन्च करत असते. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेत असते. अनेक सिक्युरिटी पॅच आणि बग्सचे निराकरण करून, Apple ने iPhone वापरकर्त्यांसाठी १६ .४ अपडेट लॉन्च केले आहेत. या अपडेटमुळे वापकर्त्यांना डिव्हाईस वापरतानाचा चांगला अनुभव मिळणार आहे. जर का तुम्ही आयफोन वापरत असाल तर हे नवीन अपडेट लवकरात लवकर डाउनलोड करा. कारण जुन्या सिरीजमध्ये काही Apps नीट काम करणार नाहीत. iOS 16.4 अपडेटमध्ये वापरकर्त्यांना काय मिळणार आहे जाणून घेऊयात.

IOS १६ .४ मध्ये मिळणार हे फायदे

Apple ने iOS १६ .४ अपडेटमध्ये २१ नवीन इमोजी वापरकर्त्यांना दिले आहेत. ज्यामध्ये जेलीफिश, ब्लॅक हॉट, पिंक हॉट, जिंजर इत्यादी अनेक इमोजींचा समावेश आहे.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

हेही वाचा : Jio Fiber Backup Plan: जिओ युजर्ससाठी आनंदाची बातमी, IPL २०२३ आधी लॉन्च झाला ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन, जाणून घ्या

iOS १६ .४ अपडेटमध्ये वापरकर्त्यांना कॉलिंगचा चांगला अनुभव मिळणार आहे. नवीन अपडेटमध्ये नॉइज कॅन्सलेशन वाढवण्यात आले आहे. ज्यामुळे फोन करणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघानांही चांगला अनुभव मिळू शकतो. यापूर्वी Apple ने आयसोलेशन फिचरला फेसटाइम आणि व्हाट्सअ‍ॅपपर्यंत मर्यादित ठेवले होते. आता हे अपडेट फिचर सेल्युलर नेटवर्कसाठी देखील जारी केले गेले आहे.

iOS १६ .४ अपडेटमध्ये, कंपनीने वेदर App मध्ये व्हॉईस ओव्हर सपोर्ट आणि फोटो App मधील डुप्लिकेट फोटो आणि व्हिडिओ ओळखण्यासाठी नवीन अपडेट दिले आहे.

हेही वाचा : ChatGpt च्या मदतीने डॉक्टरांनी वाचवला आजारी कुत्र्याचा जीव, कसे ते जाणून घ्या

कसे डाउनलोड करावे ?

IOS 16.4 अपडेट डाउनलोड करण्यासाठी सेटिंगमधील जनरल ऑप्शनवर क्लिक करून सॉफ्टवेअर अपडेट या पर्यायावर क्लिक करावे.

तुम्ही त्या पर्यायवर क्लिक करताच सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. त्यानंतर ते इंस्टॉल होईल. सॉफ्टवेअर अपडेट करताना आयफोनची बॅटरी ५० टक्क्यांपेक्षा वर असेल याची काळजी घेणे आवश्यक आहे.