फ्लिपकार्ट एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सेल आणि ऑफर्स लॉन्च करत असते. लवकरच म्हणजे ८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आपला बिग बिलियन डेज सेल २०२३ घेऊन येत आहे. ज्यामध्ये फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य असणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये ७ ऑक्टोबरपासून प्रवेश मिळणार आहे. सेल सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. मात्र मोटोरोला कंपनीने आधीच ग्राहकांना आपल्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट सेल आणि ऑफर लॉन्च केली आहे. कंपनी मोटोरोला Edge, मोटो Gआणि मोटो E सिरीजवर काही ऑफर्स घेऊन आली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन देज सेल अंतर्गत मोटोरोला आपल्या प्रॉडक्ट्सवर देत असलेल्या डील्स आणि डिस्काउंटबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटोरोला Edge 40 Neo

नुकताच मोटोरोला कंपनीने मोटोरोला Edge 40 Neo भारतात लॉन्च केला आहे. बिग बिलियन डेज सेल दरम्यान, सर्व बँक ऑफर्ससह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटसाठी १९,९९९ रुपये आणि १२/२५६ जीबी व्हेरिएंटसाठी २१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या डिव्हाइसची मूळ किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी २३,००० रुपये आणि १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी २५,९९९ रुपये इतकी आहे. मोटोरोला एज ४० निओ या स्मार्टफोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा pOLED डिस्प्ले मिळणार आहे. या फोनला ६८W चार्जिंग स्पोर्टसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला MoTo चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, किंमत आणि ऑफर्स एकदा पाहाच

मोटो G54 5G

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान तुम्ही मोटोरोलाचे फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Moto G54 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. तर या सेलमध्ये हा फोन १२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर १२ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेले मॉडेल ८ ऑक्टोबरपासून १४,९९९ रुपयांच्य किंमतीत उपलब्ध असणार आहे.

मोटो G84 5G

तुम्ही जर का २० हजार रुपयांच्या आतमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Moto G84 हा एक चांगला पर्याय असू शकतो. १९,००० रुपये किंमत असलेला हा फोन सेलमध्ये १६,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. मोटो G84 5G मध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ५००० mAh खमतेची बॅटरी तसेच ६.५५ इंचाचा डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्या वापरकर्त्यांना मिळणार आहे.

हेही वाचा : iPhone 15 खरेदी करणं बजेटच्या बाहेर जातंय? आयफोन १३ आणि १४ वर ‘या’ ठिकाणी मिळतोय एक्सचेंज बोनस

मोटो e13

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची मूळ किंमत ८,९९९ रुपये आहे. मात्र सेलमध्ये तो ६,७४९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसरचा सपोर्ट आणि ६.५ इंचाचा FHD+ डिस्प्ले व ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola announce discount on edge 40 neo g 84 and e13 at flipkart big billion days sale 2023 tmb 01
First published on: 30-09-2023 at 11:17 IST