मोटोरोला जी ३२ स्मार्टफोन – (image credit- motorola india/twitter)
Motorola ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आतासुद्धा मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च करणार आहे. मोटोरोला Moto G32 22 हा स्मार्टफोन उद्या म्हणजेच (२२ मार्च) लॉन्च होणार आहे. कंपनीने इंस्टाग्राम पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या फोनच्या किंमतीबद्दल, फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Moto G32 मध्ये अँड्रॉइड १२ आधारित अनुभव वापरकर्त्यांना मिळणार आहे. फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी यामध्ये IP52 रेटिंग देण्यात आले आहे. तसेच फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ९०HZ इतका या स्क्रीनचा रिफ्रेश रेट आहे. तसेच फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६८० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये स्पोर्ट्स स्टिरीओ स्पीकरसह डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि ड्युअल मायक्रोफोन देखील उपलब्ध आहेत.
Moto G32 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी फेस अनलॉक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
Moto G32 या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि ३०W टर्बोपॉवरचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. इतर फीचर्समध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.2 आणि NFC याचा समावेश आहे.
काय आहे किंमत ?
Moto G32 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजमध्ये आधीच लॉन्च झाला आहे. मात्र उद्या तो ८ जबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च होणार आहे. याची किंमत ११,९९९ रुपये असणार आहे. मोटोरोला इंडियन इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.