scorecardresearch

ASUS ने भारतात लॉन्च केला डायल सपोर्ट असणारा ‘हा’ जबरदस्त माउस, एकाच वेळी करता येणार अनेक कामे

प्रोआर्ट माउस हा असुस डायलला सपोर्ट करणारा कंपनीचा पहिला माउस आहे.

ausu launched ProArt Mouse MD300 launched in india
असुस प्रोआर्ट माउस एमडी ३०० – (iamge credit – Asus/Twitter)

Asus कंपनी लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स आणि अन्य उपकरणांचे उत्पादन करते. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने तुमच्यासाठी एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी असलेल्या Asus ने आपला आतापर्यंतचा सर्वोत्तम पाऊस ASUS ProArt Mouse MD300 भारतात लॉन्च केला आहे. आता आपण या माऊसची किंमत, त्याचे फीचर्स याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

काय आहेत फीचर्स ?

प्रोआर्ट माउस हा असुस डायलला सपोर्ट करणारा कंपनीचा पहिला माउस आहे. ASUS ProArt Mouse MD300 सह वापरकर्त्यांना अ‍ॅपचा सपोर्ट देखील मिळणार आहे. तुम्ही माउस वापरत असताना तुमच्या गरजेनुसार माउसमधील बटणे कस्टमाइज करू शकता. ASUS ProArt Mouse MD300 मध्ये तीन स्क्रोलर बटणांव्यतिरिक्त मोड आणि पॉवरसह एकूण पाच बटणे आहेत. या माऊसला फर्मवेअर अपडेट्सही मिळतील.

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Disney’ मध्ये दुसऱ्यांदा होणार तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले…

ASUS ProArt माउस MD300 मध्ये साइड स्क्रोल व्हील आणि ग्रेड स्विच आहेत. यामध्ये 4200dpi ट्रॅकिंग सेन्सर आहे. यासह फिंगर स्ट्रॅपही उपलब्ध आहे. तुम्ही हा माउस कस्टमाइज करू शकता. गरजेनुसार झूम किंवा फ्री व्हॉल्यूमसाठी स्क्रोलर वापरू शकता. या माउसला RF आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे. तुम्ही ASUS ProArt Mouse MD300 ला एकाच वेळी 4 डिव्हाइसेसशी कनेक्ट करू शकता. या Asus माऊसच्या बॅटरीबाबत १५० दिवसांच्या बॅकअपचा दावा करण्यात आला आहे.

काय आहेत किंमत ?

ASUS ProArt Mouse MD300 माऊसची विक्री कालपासून म्हणजेच २० मार्चपासून सुरु झाली आहे. या माऊसची किंमत ८,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ASUS ProArt Mouse MD300 व्यतिरिक्त कंपनीने ASUS Vantage Briefcase 15.6 आणि EOS 2 शोल्डर बॅग देखील लॉन्च केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 10:24 IST

संबंधित बातम्या