भारतात गेंमिंग आणि उत्तम छायाचित्र काढण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करतात. कदाचित याच गोष्टी हेरून मोटोरोलाने भारतात Moto G 72 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कारण या फोनमध्ये सुंदर छायाचित्र निघण्यासाठी १०८ मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजसह हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याची किंमत १८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. १२ ऑक्टोबरपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटोरोला जी ७२ चे फीचर

मोटोरोला जी ७२ मध्ये १०८०x२४०० पिक्सेल रेझोल्यूशनसह ६.६ इंचचा फूल एचडी प्लस पीओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गतिमान कार्यासाठी फोनमध्ये मीडियाटेक हिलियो जी ९९ चिपसेट देण्यात आला आहे. तर, सुंदर आणि गुणवत्तापूर्ण छायाचित्र काढण्यासाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

(पृथ्वीखाली महासागर आहे का? दुर्मिळ हिऱ्याने दिली माहिती)

सुरक्षेसाठी फोनमध्ये हा फीचर

फोनचा प्राइमरी कॅमेरा १०८ मेगपिक्सेलचा आहे. त्याचबरोबर, ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सेलचा माइक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

दीर्घकाळ काम करता यावे यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ३३ वॉटच्या फस्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन अँड्रॉइड १२ वर आधारित मोटोरोलाच्या माय यूएक्सवर काम करतो. फोनसाठी एक अपडेट आणि तीन वर्षांपर्यंत सिक्युरीटी पॅच जारी करणार असल्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ४ जी प्रणाली देण्यात आली. फोनमध्ये ५ जी प्रणाली नाही, त्यामुळे नुकतेच भारतात सुरू झालेल्या ५ जी गतीमान इंटरनेट सेवेचा लाभ या फोन धारकांना घेता येणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola launch moto g72 with 108 megapixel camera in india ssb
First published on: 03-10-2022 at 17:34 IST