Motorola ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने बुधवारी भारतामध्ये Moto E13 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात लॉन्च करत असते. असते. Motorola Moto E13 या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Moto E13 चे फिचर्स

Moto E13 या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १३ आणि Dual nanosim चा सपोर्ट देण्यात आला आहे. वापरकर्त्यांना या फोनमध्ये ६.५ इंचाचा HD Plus IPS LCD डिस्प्ले वापरायला मिळतो. यामध्ये ४ जीबी LPDDR4x रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते. तसेच फोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

हेही वाचा :गुगलला विसरून जा! ChatGPT सह Microsoft लवकरच लॉन्च करणार New Bing आणि Edge ब्राउझर

कॅमेरा व बॅटरी

मोटोरोलाच्या Moto E १३ या फोनमध्ये वापरकर्त्यांना १३ मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट म्हणजेच सेल्फी कॅमेरा मिळतो. दोदोन्ही कॅमेरे हे फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास एकदम चांगले आहेत. या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी येते आणि १० वॅटचे वययर्ड चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन एकदा चार्ज केला की २३ तास चालतो असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक असे फीचर्स येतात.

काय असेल किंमत ?

मोटोरोला कंपनीचा Moto E १३ हा स्मार्टफोन ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक आणि क्रीमी व्हाइट या रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. २ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही ६,९९९ रुपये आहे. तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ७,९९९ रुपये इतकी आहे. सध्याचे आणि नवीन jio च्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर ७०० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola launched moto e 13 smartphone in india with attractive features for users tmb 01