OpenAI ने Chatgpt हे चॅटबॉट लाँच केला आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. तसेच ChatGpt हे Google शी स्पर्धा करत असल्याने गुगलचे टेन्शन वाढले होते. मात्र गुगलने देखील लवकरच Bard चॅटबॉट लॉन्च करणार असल्याचे जाहीर केले आहे.गुगलने बार्डची घोषणा केल्यानंतर Microsoft कंपनीने आपल्या Bing सर्च इंजिन आणि Edge ब्राऊझरची नवीन सिरीज जाहीर केली आहे.

मायक्रोसॉफ्टने आपल्या बिंग सर्च इंजिन आणि इज ब्राऊझरची नवीन सिरीज जाहीर केली आहे. या दोन्ही सिरिजमध्ये Chatgpt चॅटबॉट एकत्रित करण्यात आले आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने या सिरीजची घोषणा आपल्या वॉशिंग्टन येथील मुख्यलयात केली. मायक्रोसॉफ्ट याला नवीन Bing असे म्हणत आहे. यामध्ये लोकं प्रश्न विचारू शकतील आणि सोप्या भाषेत उत्तरे देखील मिळवू शकतीलअशी या चॅटबॉटची कार्यक्षमता असणार आहे. हे जीपीटी ३.५ ची नवीन व अपडेटेड सिरीज वापरते त्याला प्रोमेथियस मॉडेल असे म्हणतात. जी विचालेल्या प्रश्नांचे उत्तरे व अधिक माहिती देखील वापरकर्त्यांना देते.

हेही वाचा : Microsoft ने लाँच केली ChatGPT टीम प्रीमियम सेवा, वापरकर्त्यांना मिळणार ‘हे’ फायदे

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी AI चे कौतुक केले आहे. मात्र ते म्हणाले की, वास्तविकता समजून घेऊन हे वाढवण्याची गरज आहे असे नडेला म्हणाले. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाच्या अनपेक्षित परिणामांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे असे सीईओ नडेला म्हणाले.

नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या चॅटजीपीटीने जगाला वेड लावले आहे. हा एक कृत्रिम असा प्रगत चॅटबॉट आहे. तो प्रश्नांची उत्तरे देतो. मात्र यावरून सुद्धा काही वाद निर्माण झाले कारण, काही जणांनी याचा वापर मालवेअर तयार करण्यासाठी केला. विद्यार्थ्यांनी याचा वापर करू नये म्हणून फ्रांस विद्यापीठाने चॅटजीपीटी वर बंदी घातली आहे. काही विद्यार्थ्यांनी याचा वापर गृहपाठ करण्यासाठी देखील केला आहे. हे एक कृत्रिम माध्यम असून ते आपल्याला वास्तवापासून वेगळे करू शकत नाहीत.

चॅटजीपीटी निर्माण करणारी कंपनी ओपनएआय यामध्ये भाषेत आणि त्या मॉडेलमध्ये सतत सुधारणा करत राहील. Apple , google आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्यांना ही टेक्नॉलॉजी किती बदल करू शकते याचा अंदाज आहे. Google सुद्धा Bard वर काम करत आहे. हे टूल काही दिवसांतच लोकांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: Zoom कंपनी करणार १३०० कर्मचाऱ्यांची कपात; सीईओंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ChatGPT on New Bing

You.com वर ऑफर केलेल्या चॅट प्रमाणेच Bing एक स्वतंत्र चॅट देखील ऑफर करते.Bing वरील चॅट इंटरफेस ChatGPT सारखाच दिसतो. नवीन Bing चॅट 100 भाषांमध्ये भाषांतर करू शकते. नवीन Bing च्या अनुभवाबद्दल OpenAi चे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, महत्वाच्या कामांमध्ये बदल करण्यासाठी AI चा उपयोग करून एका नवीन पर्वाची सुरुवात होईल. ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्ट तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकत्रितपणे काम करत आहेत.