Drone Rules In India : सध्या भारतात ड्रोनचा ट्रेंड चांगलाच चाललाय. विवाहसोहळ्यातील व्हिडीओ शूट करण्यापासून ते इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी ड्रोनचा वापर सर्रास केला जातो. मात्र , सरकारने आता ड्रोन संदर्भांत काही नियम बनविले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला १ लाख रुपये दंड आकारण्यात येऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासाठी वेगळी वेबसाईट देखील सुरू करण्यात आली आहे.यावर तुम्हाला ड्रोन उडवण्याच्या लायसन्सपासून मार्गापर्यंतची माहिती मिळेल. तर जाणून घेणार आहोत लग्नसमारंभात वापरले जाणारे ड्रोन नियमानुसार उडवले जातात का? अशा प्रकारचे ड्रोन वापरण्यापूर्वी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल का ? याव्यतिरिक्त ड्रोनविषयी अधिक माहिती

ड्रोन उडवण्यासाठी लागणार परवानगी ( फोटो : Reuters )

ड्रोनच्या पाच श्रेणी

भारतातील ड्रोन पाच श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. २५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोनला नॅनो म्हणतात. २ किलोपर्यंत वजनाचे ड्रोन सूक्ष्म , २ ते २५ किलो वजनाचे ड्रोन लहान, २५ ते १५० किलो वजनाचे ड्रोन हे मध्यम आणि १५० किलोपेक्षा जास्त वजनाचे ड्रोन मोठ्या ड्रोनच्या श्रेणीत टाकण्यात आले आहेत.

परवानगी का घ्यावी लागते ?

सर्व प्रकारच्या ड्रोनसाठी तुम्हाला परवानगीची गरज भासणार नाही. जर तुम्ही नॅनो किंवा मायक्रो श्रेणीतील ड्रोन वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही परवानगीची गरज नाही. परंतु, या वरील श्रेणीसाठी तुम्हाला UNI म्हणजेच अद्वितीय ओळख क्रमांक आवश्यक आहे. त्याचबरोबर ड्रोन उडवण्याबाबत काही नियम देखील बनविण्यात आले आहेत. जसे की तुम्ही ड्रोन कुठे उडवू शकता आणि किती उंचीपर्यंत ड्रोन उडवू शकता.या सर्वांची माहिती तुम्हाला डिजिटल स्काय पोर्टलवर मिळेल. येथे उडणाऱ्या ड्रोनसाठी एक हवाई नकाशा आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिरवा , पिवळा आणि लाल झोनची माहिती मिळेल. जर तुम्ही या ड्रोन नियम २०२१ चे उल्लंघन केल्यास तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need permission to fly a drone one lakh rupees fine for breaking the rules know the rules gps