netflix introduced three news games for users | Loksatta

जुने गेम्स खेळून कंटाळा आला? नेटफ्लिक्सने सादर केले ‘हे’ ३ नवीन गेम्स, जाणून घ्या माहिती

तिन्ही गेम्स जाहिरात नसलेल्या नेटफ्लिक्स सदस्यत्वासोबत किंवा इन अ‍ॅप खरेदीसह उपलब्ध होणार आहे. युजर्स आयओएस किंवा अँड्रॉइड स्मार्ट डिव्हाइसमधील नेटफ्लिक मोबाईल अ‍ॅपवर हे गेम्स शोधू शकतात.

जुने गेम्स खेळून कंटाळा आला? नेटफ्लिक्सने सादर केले ‘हे’ ३ नवीन गेम्स, जाणून घ्या माहिती
नेटफ्लिक्स

Netflix introduced three news games : नेटफ्लिक्सवर गेम खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने थ्री किंग्डम्स, कॅट्स अँड सूप आणि हेलो किटी हॅपिनेस परेड हे गेम्स युजर्ससाठी सादर केले आहेत. विशेष म्हणजे, हे गेम्स जाहिरात नसलेल्या नेटफ्लिक्स सदस्यत्वासोबत किंवा इन अ‍ॅप खरेदीसह उपलब्ध होणार आहे. युजर्स आयओएस किंवा अँड्रॉइड स्मार्ट डिव्हाइसमधील नेटफ्लिक मोबाईल अ‍ॅपवर हे गेम्स शोधू शकतात.

१) हेलो किट्टी हॅपिनेस गेम

हेलो किट्टी हॅपिनेस गेम्सबाबत बोलायचे झाल्यास, या गेमला रोग गेस्मने विकसित केले आहे. गेमध्ये जास्तीत जास्त तीन प्लेअर सहभागी होऊ शकतात जे कॉइन्स गोळा करू शकतील आणि मौजमजेला विरोध करणाऱ्या कुरोमीला विरोधी करतील, अशी माहिती कंपनीने दिली.

(आकर्षक दिसतो Google pixel 7a, लूक झाले लिक; मिळू शकते वायरलेस चार्जिंग, पाहा फोटो)

२) कॅट्स अँड सूप गेम

कॅट्स अँड सूप गेममध्ये प्लेयर्सना ग्राहकांसाठी सूप बनवण्याचे काम दिले जाते. प्लेअर्सना आपल्या साथीदार मांजरींकडून नवीन पाककृती आणि हर्ट्स गोळा करावे लागतील. यासाठी मांजरींना पकडेलेली मासे खायला द्यावी लागतील.

३) थ्री किंग्डम्स

हा कार्ड गेम आहे, ज्यामध्ये प्लेअर युद्ध लढतात आणि राजकारण करतात. डेव्हलपर्सनुसार, या गेममध्ये पुढे जाताना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, योग्य सैन्यासोबत योग्यवेळी भागीदारी करण्यासाठी आणि शक्तिशाली होण्यासाठी प्लेअरला युद्ध, गट आणि नायकांचा सामना करावा लागेल.

नेटफ्लिक्स AAA नावाच्या गेमवर काम करत असल्याचे एका अहवालातून समोर आले होते. हा नेटफ्लिक्सचा पहिला अंतर्गतरित्या विकसित केलेला गेम असू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 13:35 IST
Next Story
आकर्षक दिसतो Google pixel 7a, लूक झाले लिक; मिळू शकते वायरलेस चार्जिंग, पाहा फोटो