ट्रूकचे इअरबड्स

  • किंमत : १३९९ रुपये.

‘ट्रूक’ या भारतातील कंपनीने ईअरबड्स लाइट व बीटीजी ३ बाजारात आणले आहेत. या दोन्ही इअरबड्सची वैशिष्टय़े सारखीच असली तरी, त्यांची रचना वेगवेगळी आहे.  हे दोन्ही इअरबड्स खास करून गेिमगसाठी वैशिष्टय़पूर्ण आवाजाचा अनुभव देतात. यातील एम्पिरिकल तंत्रज्ञानामुळे बॅटरी वापर, ट्रान्समिशन वेग आणि कनेक्शन वेग दुप्पट होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये ‘डीप न्यूट्रल नेटवर्क कॉल नॉइज कॅन्सलेशन’ तंत्रज्ञान पुरवण्यात आले असून त्यामुळे अगदी गोंगाट असलेल्या ठिकाणीही तुम्ही व्यवस्थित संभाषण करू शकता. ग्राहकाच्या आवडीनुसार डाव्या बाजूच्या इअरबडवर ३ वेळा टॅप करत इन-इअर डिटेक्शन ऑन/ऑफ करता येऊ शकते.  बीटीजी३ मध्ये सानुकूल गेम कोअर चिपसेटसह उच्च कार्यक्षमता व सुधारित साऊंड क्वॉलिटी आहे. कॉम्पॅक्ट केस डिझाइनसह एर्गोनॉमिक इन-इअर इअरबड्स ४८ तासांचे प्लेटाइम, एका चार्जमध्ये १० तासांचे प्लेटाइम आणि ३०० एमएएच चार्जिग केससह अतिरिक्त ३८ तासांचे प्लेटाइम देतात. 

नोकियाही ‘ऑडिओ’ तंत्रज्ञान बाजारात

नोकिया फोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया लाइट इअरबड्स बीएच-२०५ आणि वायर्ड बड्स ‘डब्ल्यूबी १०१’ या दोन इअरबड्ससह ऑडिओ तंत्रज्ञान बाजारात प्रवेश केला आहे.   बीएच-२०५मध्ये ६ एमएम ऑडिओ ड्रायव्हर्स आहेत आणि हे इयरबड्स आवाजाची स्टुडिओ-टय़ून्ड गुणवत्ता प्रदान करतात. प्रत्येक बडमध्ये दोन ४० एमएएच बॅटरीज आहेत (एकदा चार्ज केल्यावर ६ तास चालतात), ३६ तासांचा प्लेटाईम आणि चार्जिग केसमध्ये ४०० एमएएच बॅटरीसह अतिरिक्त ३० तासांचा प्लेटाईम मिळतो. ब्ल्यूटूथ ५.० असल्यामुळे या इयरबड्सना अनेक वेगवेगळय़ा डिव्हायसेससोबत जोडले जाऊ शकते.   डब्ल्यूबी १०१मध्ये १० एमएम सक्षम ड्रायव्हर्स आणि पॅसिव्ह नॉइज आयसोलेशन यांचा समावेश आहे. हे बड्स स्मार्ट व्हॉइस असिस्टंट्स अलेक्सा, सिरी आणि गूगल असिस्टंट यांना सपोर्ट करतात. 

  • किंमत : नोकिया लाइट इअरबड्स २७९९ रुपये
  • नोकिया वायर्ड बड्स  २९९ रुपये

मायक्रोसॉफ्टचा सरफेस प्रो एक्स

मायक्रोसॉफ्टने विंडोज ११ आवृत्ती असलेल्या सरफेस प्रो एक्स हा १३ इंची टॅब्लेट बाजारात आणला आहे. अवघे ७७४ ग्रॅम वजन असलेल्या या टॅब्लेटची वेगवान कनेक्टिव्हिटी, अधिक बॅटरी क्षमता आहे. यामध्ये शक्तिशाली फ्रंट कॅमेरा दिला असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि ‘आय कॉन्टॅक्ट’ हे ऑनबोर्ड न्यूरल इंजिन तुम्हाला व्हिडीओ कॉल्सवर नजर अ‍ॅडजस्ट करण्यात साह्य करते त्यामुळे तुम्ही थेट कॅमेऱ्यात पाहत असल्याचे चित्र समोरील व्यक्तीला दिसते. यातील डय़ुअल फार-फिल्ड स्टुडिओ माइक आणि उत्कृष्ट स्पीकर्समुळे व्हिडीओ कॉिलगचा अप्रतिम अनुभव तुम्हाला मिळू शकतो. यातील अत्यंत आकर्षक, हाय रिझोल्युशन १३ इंची पिक्सेलसेन्स टचस्क्रीन आणि आयकॉनिक बिल्ट इन किटस्टँड अगदी सहजपणे तुमच्या गरजेनुसार, हवे तसे, हवे तेव्हा आपली पोझिशन अ‍ॅडजस्ट करतो. सुरक्षितरीत्या साठवणूक केलेले आणि सिग्नेचर कीबोर्डवर चार्ज केलेले सरफेस स्लिम पेन २ तुम्हाला लेखनाचा उत्कृष्ट अनुभव देईल आणि स्क्रीनवर आल्याक्षणीच यातील झीरो फोर्स इंकिंग सहजपणे पेनातून बाहेर पडते. 

  • किंमत : ९४,५९९ पासून सुरू