२ दिवसांनंतरही सर्वांसाठी मेसेज डिलीट करणे होणार शक्य; WhatsApp च्या नव्या फीचरमुळे युजर्स खुश

जेव्हा हे फीचर जेव्हा नव्याने लॉंच झाले होते तेव्हा सर्वांसाठी मेसेज डिलीट करण्याचा अवधी हा केवळ ८ मिनिटांचा होता.

you will be able to delete even two day old messages for everyone
आता आपल्याला दोन दिवस जुना मेसेजही सर्वांसाठी डिलीट करणे शक्य होणार आहे. (Photo : Pexels)

‘डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन’ या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेला मेसेज डिलीट करणे खूप सोपे झाले आहे. मात्र, हे फीचर काही वेळेपुरतेच वापरता येते. काही तासांनंतर किंवा मेसेज जुना झाल्यानंतर तो सर्वांसाठी डिलीट करता येत नाही. हे फीचर जेव्हा नव्याने लॉंच झाले होते तेव्हा सर्वांसाठी मेसेज डिलीट करण्याचा अवधी हा केवळ ८ मिनिटांचा होता. त्यानंतर तो वाढवून एक तास करण्यात आला. आता कंपनी हा कालावधी आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार आता आपल्याला दोन दिवस जुना मेसेजही सर्वांसाठी डिलीट करणे शक्य होणार आहे.

व्हॉट्सअप बीटा इन्फो (डब्यूए बीटा इन्फो) या व्हॉट्अपसंदर्भात माहिती देणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने लेटेस्ट बीट २.२२.१५.८ च्या काही युजर्ससाठी सर्वांसाठी मेसेज डिलीट करण्याचा अवधी वाढवून २ दिवस १२ तास केला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अपडेटमध्ये हा कालावधी केवळ १ तास ८ मिनिटे आणि १६ सेकंद आहे. यानंतर मेसेज सर्वांसाठी डिलीट केला जाऊ शकत नाही.

WhatsAppने ब्लॉक केलेले अकाउंट पुन्हा अनब्लॉक करता येणार; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

टेलिग्राम या अ‍ॅपमध्ये मेसेज डिलीट करण्याचा कालावधी ४८ तासांचा आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने आपला कालावधी २ दिवसांच्या वर वाढवल्यानंतर ते आघाडीवर असेल. अहवालानुसार, वापरकर्त्यांना या मर्यादा वाढीबाबत कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही, त्यामुळे वापरकर्त्यांना स्वतः हे फीचर तपासावे लागेल.

याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक डिलीट मेसेज फीचर आणत आहे ज्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिन्स इतर सदस्यांसाठी ग्रुपमधील कोणाचेही चॅट डिलीट करू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच सांगितले आहे की त्यांनी नवीन आयटी नियम २०२१ अंतर्गत मे महिन्यात भारतात १९ लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now even after 2 days it will be possible to delete the message for everyone users are happy with whatsapp new feature pvp

Next Story
नवीन Infinix Smart Tv ११ हजार रूपयांपेक्षाही कमी किमतीत, वाचा सविस्तर
फोटो गॅलरी