गूगल सर्चमधील वैयक्तिक माहिती काढून टाकता येणार; लवकरच येणार 'हे' फीचर | Now you can request google to delet personal information saved in search feature will launch soon | Loksatta

गूगल सर्चमधील वैयक्तिक माहिती काढून टाकता येणार; लवकरच येणार ‘हे’ फीचर

अनेक वेळा आपण गूगलवर जे सर्च करतो ती माहिती सेव्ह केली जाते. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती देखील असु शकते.

गूगल सर्चमधील वैयक्तिक माहिती काढून टाकता येणार; लवकरच येणार ‘हे’ फीचर
(Photo : Indian Express)

गूगलवर जेव्हा काही सर्च केले जाते तेव्हा ती माहिती सेव्ह होते. मग त्याच्याशी निगडित माहिती, बातम्या आपल्याला दिसायला लागतात. बऱ्याचवेळा आपण विचारात पडतो की एकदा सर्च केलेल्या गोष्टीबद्दलचे इतके नोटिफिकेशन, जाहिराती का दिसत आहेत? याचे कारण म्हणजे डिजिटल फूटप्रिंट. म्हणजेच आपण ज्या काही गोष्टी सर्च करतो त्याची माहिती सेव्ह केली जाते. यामध्ये वैयक्तिक माहितीचा देखील समावेश असु शकतो. यामुळे आर्थिक फसवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारची डिजिटल फसवणूक होण्याची शक्यता असते. यामध्ये वैयक्तिक माहिती इतर साईट्सबरोबर शेअर केली जाण्याची शक्यता असते. याबाबत युजर्सकडुन तक्रारी करण्यात आल्यानंतर यावर गूगल ॲक्शन घेणार आहे.

काय आहे गूगलचे नवे टूल

  • गूगल एक नवीन टूल लॉन्च करत आहे.
  • याअंतर्गत युजर्स पर्सनली आयडेंटीफाएबल इन्फॉरमेशन (PII) म्हणजेच वैयक्तिक माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकतील.
  • सध्या हे टूल युरोप आणि अमेरिकेमधील अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

आणखी वाचा : ड्युअल सिममध्ये एअरटेलचे कार्ड वापरताय? फक्त नंबर चालू ठेवायचा असेल तर सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते जाणून घ्या

हे टूल वापरण्याची पद्धत

  • लवकरच युजर्सना गूगल सर्च मेन्युमध्ये ‘रिझल्ट अबाऊट यु’ हा नवीन पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यावर युजर्सना एका नव्या पेजवर रिडायरेक्ट करण्यात येईल.
  • यामध्ये गूगल सर्चमधून वैयक्तिक माहिती काढून टाकण्याबाबतची माहिती उपलब्ध होईल.
  • युजर्सना याबाबत रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल.

या स्टेप्स वापरल्यानंतरही जर तुम्हाला गूगल सर्च रिझल्टमध्ये वैयक्तिक माहिती दिसली, तर तुम्ही गूगल सपोर्ट पेजची मदत घेऊ शकता. यामध्ये देखील फॉर्म भरून युजर्स गूगलवर माहिती सेव्ह न करण्याचा पर्याय निवडू शकतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Vodafone Idea vs Reliance Jio: ३९९ रुपयांमध्ये कोणता प्लॅन बेस्ट? अनलिमिटेड कॉल्स आणि बरंच काही…

संबंधित बातम्या

ड्युअल कॅमरा सेटअपसोबत मिळू शकतो OPPO FIND N2 FLIP, व्हिडिओमध्ये पाहा फोनचा भन्नाट लूक
TWITTER: इलॉन मस्कच्या पुणेकर मित्राचे खाते निलंबित, ‘हे’ आहे कारण
७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट
विश्लेषण: हॅकर्स तुमच्या ब्लूटूथ उपकरणांद्वारे डेटा कसा चोरतात? ‘ब्लूबगिंग’ हॅकिंग तंत्र नेमकं आहे तरी काय?
MIVI MODEL E भारतात लाँच, 120 स्पोर्ट्स मोडसह मिळतंय ७ दिवसांची बॅटरी लाईफ, किंमतही कमी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
PAK vs ENG: “तबीयत ठीक नहीं है तो ५०० रन मारा, ठीक होते तो…” शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ओढले ताशेरे
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस पडली देसी जुगाड केलेली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; म्हणाले “जगासाठी…”
‘आगामी वन-डे विश्वचषकात ऋतुराज गायकवाड नक्की दिसेल’; प्रशिक्षक मोहन जाधव यांचा विश्वास
शेजाऱ्यांनी चक्क घरच खांद्यावर उचलून घेतले अन्…; कारण जाणून तुम्हालाही वाटेल कौतुक
डहाणुकरांसाठी खुषखबर…; लवकरच १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवास घडणार