OnePlus ही एक प्रसिद्ध अशी मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स बाजारात लॉन्च करत असते. असाच एक नवीन फोन बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीने २०१९ मध्ये नॉर्ड सिरीज लॉन्च केली होती. मध्यम बजेट रेंजमध्ये असणारा हा पहिला स्मार्टफोन होता. यानंतर कंपनीने किंमत आणि फीचर्स याचा समन्वय राखत OnePlus Nord 2 हा स्मार्टफोन लॉन्च केला. आता लवकरच कंपनी नॉर्ड सिरीजमधील One Plus Nord 3 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. याबाबत कंपनीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनप्लसच्या Nord 3 फोनची टेस्टिंग भारत आणि बाहेरील देशांमध्ये सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच लवकरच वनप्लसच्या या फोनचे लॉन्चिंग होणार आहे असं वाटत आहे. वनप्लसच्या Nord 3 या फोनच्या फीचर्स, किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा : VI वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच लॉन्च होणार ५जी नेटवर्क सेवा

OnePlus Nord 2 स्मार्टफोनची माहिती बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहे. आणि आता असे दिसते आहे की हे OnePlus चे हे डिव्हाइस लवकरच लॉन्च केले जाईल. टिपस्टर योगेश बरार यांच्या मते, Nord 3 स्मार्टफोनची चाचणी भारतीय आणि जागतिक बाजारपेठांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत कंपनीने लॉन्चशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

फीचर्स

माहितीनुसार, वनप्लस नॉर्ड ३ स्मार्टफोन कंपनीच्या OnePlus Ace 2V चे रिब्रँडेड व्हर्जन असेल. OnePlus Ace 2V नुकताच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.७२ इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. याची स्क्रीन ही फुलएचडी रिझोल्युशनसह येईल. याचा रिफ्रेस्ट रेट हा १२० Hz इतका असेल. तसेच या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसीटी ९००० हा प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन ८ व १६ जीबी रॅम तसेच २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज या पर्यायांमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. कंपनीने हा स्मार्टफोन कधीपर्यंत लॉन्च होणार आणि याची किंमत असणार याबद्दल कोणत्या प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा : WhatsApp च्या ‘या’ तीन सेफ्टी फीचर्समुळे चॅटिंग होणार अधिक सुरक्षित; हॅकर्सची बोलती होणार बंद

तसेच वनप्लसच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ट्रीपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये ५० MP चा प्रायमरी , ८ MP चा अल्ट्रा वाईड आणि २ MP ची मॅक्रो लेन्स असू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ MP चा कॅमेरा कंपनी देऊ शकते. फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. तसेच यामध्ये एक अलर्ट स्लाईडर दिला जाईल. अलर्ट स्लाईडर हा वनप्लसच्या फोनमधील एक आयकॉनिक फिचर आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One plus launched nord 3 smartphone soon india with 5000 mah battery and best features tmb 01