भारतीय बाजारात सध्या विविध कंपन्यांचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये वनप्लस (OnePlus) ही कंपनी प्रसिद्ध आहे. पण, आता कंपनी पुन्हा एकदा स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने त्यांचे शेवटचे घड्याळ २०२१ मध्ये लाँच केले होते. वनप्लस ब्रॅण्डचे पहिले स्मार्टवॉच प्रीमियम डिझाइन आणि बॅटरीने परिपूर्ण होते. पण, आता कंपनी अवघ्या तीन वर्षांनंतर एक नवीन घड्याळ लाँच करणार आहे. त्याबद्दल आपण या बातमीतून अधिक जाणून घेणार आहोत.

वनप्लसने वेअर ओएस WearOS सारख्या गोष्टीकडे जाण्याऐवजी रीअल-टाइम ओएस (RTOS)वर त्यांचे नवीन स्मार्टवॉच सॉफ्टवेअर तयार करण्याचे ठरविले आहे. ग्राहकांच्या मूलभूत गोष्टी पूर्ण करण्यासाठी कंपनी हे नवीन स्मार्टवॉच सादर करीत आहे. आगामी घड्याळाचे स्पेसिफिकेशन सांगायचे झाल्यास यात १.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन W5 Gen 1 प्रोसेसर असणार आहे. हे स्मार्टवॉच सुधारित हेल्थ फीचर्ससह आणि काही अपग्रेडेड फीचर्ससह ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, वनप्लसचे दुसरे स्मार्टवॉच (OnePlus Watch 2) अधिकृतपणे आगामी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC)मध्ये सादर केले जाईल. वनप्लसने अधिकृत एक्स (ट्विटर)वर @OnePlus_IN एक टीझर फोटो शेअर केला आहे. कंपनीने डिव्हाइसचे स्पष्ट नाव सांगितलेले नाही. पण, कंपनीचे हे दुसरे स्मार्टवॉच असल्यामुळे याला वनप्लसचे दुसरे स्मार्टवॉच (Watch 2) म्हणून संबोधले जात आहे. कंपनी सध्या स्मार्टवॉचवर काम करीत असल्याचे फोटोवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा…तुमच्या आवडत्या युट्यूब व्हिडीओचे करा GIF मध्ये रूपांतर; फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

पोस्ट नक्की बघा :

याआधी स्मार्टफोन वनप्लस १२ बरोबर हे स्मार्टवॉच लाँच होणार, असे सांगण्यात आले होते. पण, आता हे स्मार्टवॉच २६ फेब्रुवारीला लाँच होणार आहे. तसेच या टिझर इमेजमध्ये तुम्हाला स्मार्टवॉचची पहिली झलक पाहता येईल; ज्यात स्मार्टवॉचचा रंग काळा आहे आणि वर्तुळाकार डायलला दोन बटणे आहेत, असे दिसून येत आहे.

तसेच या खास क्षणाबद्दल सांगताना वनप्लसचे सह-संस्थापक व सीईओ पीट लाऊ यावेळी म्हणाले की, वनप्लस वॉच २ साठी ग्राहकांकडून अनेकदा मागणी आली. वनप्लस वॉच दोन ते तीन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा ग्राहकांसमोर येत आहे. लाँचनंतर सर्वांच्या नजरा या नवीन स्मार्टवॉचवर असतील, असे यावेळी सीईओ म्हणाले आहेत. आता लवकरच ग्राहकांसाठी वनप्लसचे वॉच 2 लाँच केले जाईल.