इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) हा भारतातील मोठा राजकिय पक्ष आहे. काँग्रेसची (Congress) स्थापना २८ डिसेंबर इ. स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली.
मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ (Indian National Congress) म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते. नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे. सध्या या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ६० वर्षे काँग्रेस सत्तेत होती.
२०१७ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला भाजपाकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, या काँग्रेस मंडळींनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले आहे. तर डॉ राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भुषवले आहे. Read More
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये कल्याणकारी योजना, हिंदुत्वाचा अजेंडा आणि जातीय राजकारणाचे मुद्दे गाजले. हे मुद्दे पुढील काही निवडणुकातही कायम राहतील,…