OpenAI New AI Models 2025 OpenAI ओ 3 आणि ओ 4 ही नवी दोन मॉडेल्स आता चॅटजीपीटी प्लसच्या उपलब्ध झाली आहेत. या दोन्ही फिचर्समुळे AI आता इमेज म्हणजेच फोटोसह विचार करु शकणार आहे. तसंच या दोन फिचर्सचा उपयोग कोडिंगसाठीही केला जाऊ शकणार आहे. कृत्रीम बुद्धिमता हा विषय चर्चेचा ठरतोच आहे, या शिवाय आता ही दोन मॉडेल्स फोटोंसह विचार करु शकणार आहेत.
नवी दोन मॉडेल्स कसं काम करणार?
शैक्षणिक आणि इतर डोमेनमधील कठीण कार्ये हाताळण्याची क्षमता असलेलं ओपनएआय आता ओ 3 या मॉडेलमध्ये असणार आहे. आजवरचं सक्षम मॉडेल म्हणून याकडे पाहिलं जातं आहे. तर ओ 4-मिनी विविध पर्याय उपलब्ध करुन देणारं फिचर आहे. वेब ब्राऊझिंग असो किंवा इमेज जनरेशन दोन्ही एकाच सेशनमध्ये आता करता येणार आहे. एवढंच नाही तर ओ 3 आणि ओ 4 ही दोन्ही फिचर्स रेखाचित्रं, आकृत्या, कमी गुणवत्ता असलेले फोटो कुठले हे सगळं सांगू शकणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मॉडेल्सचा वापर युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर होईल यात शंका नाही.
कोडेक्स नावाचं फिचरही चर्चेत
जीपीटी-4 ओ हे गेल्या वर्षी ऑडिओ, व्हिजन आणि टेक्स्टवर रिअल-टाइम रीझनिंग करणारे प्रमुख मॉडेल म्हणून सादर झालं होतं. माहितीनुसार, ओपनएआय जीपीटी-4.1 सोबतच त्याच्या छोट्या जीपीटी-4.1 मिनी आणि नॅनो आवृत्त्या या आठवड्यात जाहीर होणार होत्या ज्या झाल्या आहेत.टूल इंटिग्रेशन करुन ही दोन मॉडेल्स आणण्यात आली आहेत. या मॉडेल्ससह ओपन एआयने Codex CLI हे कोडिंगशी संबंधित फिचरही आणलं आहे. हे फिचर ओ 3 आणि ओ 4 ला सपोर्ट करेल. त्यानंतर हे टूल लवकरच जीपीटी 4.1 लाही सपोर्ट करणार आहे. आता या नव्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये आणखी काय काय अपडेट मॉडेल येणार ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. सीएनबीसीने हे वृत्त दिलं आहे.