Oppo A58 5G launched : मोबाईल निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांपैकी एक ओप्पोने आपला Oppo A58 5G हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. या फोनबाबत अनेक लिक्स प्रकाशित झाले होते. आखेरीस हा फोन लाँच झाल्याने त्याच्या फीचर्सवरून पर्दा हटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमध्ये हा फोन प्रि-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ओपो चायना ऑनलाइन स्टोअरच्या माध्यमातून ग्राहकांना हा फोन मिळेल. फोन एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ८ जीब रॅम आणि २५६ जीबी रोम असलेल्या व्हेरिएंटची किंमत जवळपास १९ हजार रुपये आहे. ओप्पो ए ५८ ५जी हा फोन स्टार ब्लॅक, ब्रिझ पर्पल आणि ट्रान्क्विल या तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

(काय आहे कम्युनिटी फीचर? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे करा तयार)

स्मार्टफोनमध्ये मिळते हे फीचर्स

फीचरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ओप्पो ए ५८ ५जी फोनमध्ये डायमेन्सिटी ७०० जीपीयूसह जोडलेले गतिमान मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० प्रोसेसर देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये ७२० x १६१२ पिक्सेल ६.५६ इंच एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले ६०० निट्सची उच्च ब्राइटनेस देते.

कॅमेरा

फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळते. यामध्ये गुणवत्तापूर्ण छायाचित्र काढण्यासाठी एफ/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एफ/२.४ अपर्चरसह २ मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे कॅमेरे ३० एफपीएससह फूल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी सक्षम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

(१० दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ, किंमत केवळ २९९९ रुपये, जाणून घ्या ‘या’ घडाळीचे भन्नाट फीचर्स)

स्मार्टफोनचे वजन जवळपास १८८ ग्राम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. फोनमध्ये दीर्घकाळ काम करण्यासाठी ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी ८.५ तासांचा गेमिंग टाईम देते असल्याचे सांगितल्या जाते. ओप्पो ए ५८ ५जी स्मार्टफोन ३३ वॉट सुपर व्हीओओसी फास्ट चार्जिंगसाठी सक्षम आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo a58 5g launched check price and features ssb
First published on: 09-11-2022 at 10:13 IST